• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला दुखापत, ट्रकचा रॉड लागला, नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 27, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
truck rod hit on Minister Girish Mahajan head know in detail

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला दुखापत, ट्रकचा रॉड लागला, नेमकं काय घडलं?

वरणगाव (जळगाव) : मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. देशसेवा बजावत असताना वीरमरण आलेल्या वरणगाव येथील अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना ही घटना घडली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्याने ही दुखापत झाली.

काय आहे संपूर्ण घटना –

दुखापतीच्या या घटनेनंतर जखमी अवस्थेतच मंत्री गिरीश महाजन यांना वरणगाव येथील निमजाय हॉस्पिटल येथे नेण्यात आले. याठिकाणी त्यांनी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. त्यानंतर, महत्त्वाच्या बैठकीमुळे ते पुढे नाशिककडे रवाना झाले.

जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील जवान नायक अर्जुन लक्ष्मण बावस्कर यांना आसाम-अरुणाचल सीमेवर देशाचे रक्षण करत असताना वीरमरण आले. आज त्यांच्यावर वरणगांव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर जवान अर्जुन लक्ष्मण बावस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आज वरणगाव शहरात आले होते. यावेळी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रॅकमध्ये चढले असताना ट्रॅकचा वरचा लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला लागला. त्यानंतर, डोक्यातून रक्तस्राव होत असताना गिरीश महाजन यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले. मात्र, त्यांच्या डोक्याचे रक्त थांबत नसल्याने त्याठिकाणी उपस्थित असलेल्या माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, शेख आखलाक यांनी मंत्री गिरीश महाजन यांना आग्रह करुन प्राथमिक उपचारासाठी तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये नेले. रुग्णालयात डॉ. निलेश पाटील यांनी त्यांच्यावर उपचार केले.

त्यानंतर, गिरीश महाजन यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या परिवाराला भेट दिली आणि काळजी करू नका देशसेवा करीत असतांना अर्जुनला वीर मरण आले याचे दुःख आमच्या मनात आहे. मात्र, मी व राज्य सरकार बाविस्कर परिवाराच्या दुःखात सहभागी आहे, या शब्दात सांत्वन केले.

डोक्याला मार लागलेला असतानाही अंत्ययात्रेत सहभागी –

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला मार लागल्यावरही ते पुढे अंत्ययात्रेत तिरंगा सर्कलपर्यंत चालत गेले. तसेच तिथे हजारो वरणगावकरांच्या उपस्थित त्यांनी वीर जवान यांना मानवंदना दिली, त्यानंतर नाशिक येथे महत्वाची बैठक असल्याने मंत्री गिरीश महाजन नाशिककडे वाहनाने रवाना झाले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: girish mahajangirish mahajan latest newsminister girish mahajan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अट्टल टोळी जेरबंद

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अट्टल टोळी जेरबंद

April 29, 2026
चाळीसगाव येथे 5 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

चाळीसगाव येथे 5 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

April 29, 2026
‘अमृत भारत एक्सप्रेस’चा भुसावळ व जळगाव येथे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ शुभारंभ

‘अमृत भारत एक्सप्रेस’चा भुसावळ व जळगाव येथे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ शुभारंभ

April 29, 2026
मस्साजोगचा धक्कादायक निकाल; दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा अनपेक्षित पराभव

मस्साजोगचा धक्कादायक निकाल; दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा अनपेक्षित पराभव

April 29, 2026
धक्कादायक! धरणगावमध्ये भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

धक्कादायक! धरणगावमध्ये भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

April 29, 2026
मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक; पोलीस कर्मचाऱ्यासह तिघं आरोपींना जळगाव एलसीबीने केली अटक

मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक; पोलीस कर्मचाऱ्यासह तिघं आरोपींना जळगाव एलसीबीने केली अटक

April 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page