• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 14, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

अंतरवाली सराटी (जालना), 14 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १७ वा दिवस आहे. प्रकृती खालावल्याने आता सलाईनही न लावता त्यांचे उपोषण सुरू आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जाण्यावर ठाम असल्याचे दिसून येत असताना अंतरवाली सराटीतून मराठा समाजाला त्यांनी भावनिक साद घातली आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? –

अंतरवाली सराटी येथे आज 14 सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांग पाटील म्हणाले की, मुंबईला एकट्याने जाणार असून चार-पाच सहकारी सोबत असतील. मला उठून उभे राहणेही शक्य होत नाही. त्यामुळे रस्त्यात माझ्या सत्काराचे नियोजन करू नका. बोलता आले तर भाषण करेन; मात्र मला भेटण्यासाठी येण्यावर कोणतेही बंधन नाही. दरम्यान, ही शक्यतो माझी गोदा पट्ट्याशी आणि महाराष्ट्राशी शेवटची भेट असू शकते. त्यामुळे आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर या, मात्र मुंबईला येऊ नका, अशी भावनिक साद त्यांनी मराठा समाजाला घातली.

“मला समाजाला हरू द्यायचे नाही. जिथे देह टेकेल तिथे टेकेल; मात्र मराठ्यांनी अभिमानाने मान उंचावेल, अशा पद्धतीने लढले पाहिजे. समाजातील लेकरांची मान उंचावली पाहिजे. ‘मेला पण हटला नाही’ असे लोकांनी म्हटले पाहिजे,” असे जरांगे यांनी सांगितले.

“मला असं खितपत पडून मरायचं नाही, तर समाजाला काहीतरी देऊन मरायचं आहे. समाजाची प्रतिष्ठा इंचभरही ढळू द्यायची नाही. प्रत्येक घरातील वयोवृद्ध व्यक्तीने अभिमानाने म्हणावे की, ‘असं पोरगं मराठ्यांच्या पोटी जन्माला आलं.’ शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या तोंडात समाजाच्या लेकरांना आरक्षण मिळावे, हाच शब्द होता. तो पळून गेला नाही, छातीवर गोळ्या झेलल्या; पण आंदोलनातून मागे हटला नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठा समाजाच्या मागणीसाठी कोणापुढेही शरण जाणार नाही किंवा झुकणार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

“तुमच्या लेकरांसाठी कोणापुढेही झुकायचे नाही. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीस तोड डाव टाकायचा आहे,” असे ते म्हणाले. आंदोलन चिरडण्यासाठी समाजात फूट पाडण्याचा आणि दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा आरोपही त्यांनी केला.

“मराठा समाजाला नेत्यांची कमतरता नाही. एक नेता नाही तर दुसरा नेता आहे. जो आरक्षण देईल, त्याला निवडून आणायचे. तुमच्या आवडीचा नेता किंवा पक्ष महत्त्वाचा नाही; तुमच्या लेकरांचे कल्याण कोण करणार, हे महत्त्वाचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.

मराठा समाज कोणत्याही क्षणी मुंबई ठप्प करू शकतो, असा दावा करताना राजकारणी आणि श्रीमंत मराठ्यांची संख्या मर्यादित आहे; मात्र मोठ्या संख्येने असलेला सामान्य मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटू शकतो, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे रवाना होण्याबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. “उद्या सकाळी ११ वाजता मी फक्त चार-पाच लोकांना सोबत घेऊन दोन गाड्या आणि दोन रुग्णवाहिकांसह मुंबईकडे निघणार आहे. मला कोण अडवतंय आणि कोण परवानगी देत नाही, तेही आता बघतो. महाराष्ट्रही आता बघणार आहे,” असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

हेही वाचा: Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

बातमी शेअर करा !
Share
Tags: hunger strike for maratha reservationmanoj jarange patilmaratha community antarwali saratimaratha reservationmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

September 14, 2026
Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

September 14, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

September 13, 2026
आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

September 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page