• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 16, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

मुंबई, 16 सप्टेंबर: राज्यातील नद्यांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘महाराष्ट्र नदी संवर्धन अभियान’ राबविण्यात येईल. अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिक येथे आयोजित संमेलनातून लवकरच करण्यात येणार आहे. या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असून आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक येथे विशेष राज्यस्तरीय कार्यशाळा तसेच कार्यक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे.

मंत्रालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नदी पुनरुज्जीवनबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस डॉ. राजेंद्र सिंह, सचिव एकनाथ डवले, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सचिव (लाभक्षेत्र विकास) प्रकाश मिसाळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि जल बिरादरीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान राबविले होते. या अभियानांतर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यांमधील १०८ नद्यांचा अभ्यास करण्यात आला. नद्यांविषयी जनजागृती करण्यासह त्या अविरल, निर्मळ आणि प्रवाही करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचाही अभ्यास करण्यात आला आहे.

स्थानिक नागरिक, विद्यार्थी, पारंपरिक ज्ञान असलेले अभ्यासक, शास्त्रज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या सहभागातून लोकअभ्यास व कृती आराखडे तयार करण्यात आले आहेत. या आराखड्यांमध्ये सुचविलेल्या उपाययोजनांच्या आधारे जलसंपदा विभाग आणि राज्य शासनाचे अन्य संबंधित विभाग समन्वयाने नदी संवर्धनाचे काम करणार आहेत.

जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी यावेळी महाराष्ट्रातील नद्यांचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन हा महत्त्वाचा विषय आहे, असे सांगत या पार्श्वभूमीवर विविध पातळीवर शासनाच्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त केले. महाराष्ट्रात नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी या प्रयत्नांचा भाग म्हणून नाशिक येथे होणारा कार्यक्रम महत्त्वाचा ठरेल असे ते म्हणाले.

बैठकीस जल बिरादरीचे नरेंद्र चुघ, डॉ. सुमंत पांडे, अभिनेते चिन्मय उदगीरकर, महेंद्र महाजन, राजेश पंडित, मनोज साठे आदि प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाचा अभ्यास करून आंध्र प्रदेशातही अशा प्रकारचा कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने जल बिरादरीचे राष्ट्रीय समन्वयक सत्यनारायण बोलशेट्टी यांनी बैठकीत सहभाग घेतला.

हेही वाचा: “….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsminister girish mahajanriver conservation campaignsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

October 30, 2026
“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

October 29, 2026
धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

October 29, 2026
पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

October 29, 2026
Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

October 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page