• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जामनेर

जामनेर तालुक्यात शेततळ्याद्वारे ऐतिहासिक जलक्रांती; राज्यात आणि देशात आदर्श असा प्रकल्प राबवू – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 31, 2025
in जामनेर, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Historic water revolution through farm pond in Jamner taluka We will implement a model project in the state and country said Water Resources Minister Girish Mahajan

जामनेर तालुक्यात शेततळ्याद्वारे ऐतिहासिक जलक्रांती; राज्यात आणि देशात आदर्श असा प्रकल्प राबवू - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात शेतीला शाश्वत सिंचनाचा आधार मिळावा आणि तालुक्यातील प्रत्येक इंच जमीन पाणीदार होण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने गोंडखेड येथे भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या वेळी त्यांनी तालुक्यात राज्य आणि देशात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या जलसंधारण प्रकल्पाची घोषणा केली.

मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मुबलक पाणी मिळावे, शेती बहरावी आणि उत्पादन दुप्पट व्हावे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. शेततळे हा शाश्वत सिंचनाचा उत्तम पर्याय असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवता येईल.”

पहिल्या टप्प्यात व्यापक अंमलबजावणी –

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील 28 गावांमध्ये 2020 शेततळ्यांची निर्मिती करण्याचे नियोजन आहे. यासाठी राज्य शासनाचा निधी उपलब्ध होणार आहे. गोंडखेड येथे पार पडलेल्या या भव्य मेळाव्यात हजारो शेतकरी व लाभार्थ्यांनी सहभाग घेतला.

शेतकऱ्यांसाठी विविध मार्गदर्शन सत्रे –

गोंडखेड शिवारातील शेतकरी मेळाव्यात सुक्ष्मसिंचन शेतीसोबतच जोडधंदे म्हणून पशुपालन, मस्यपालन, फळशेती तसेच शेततळे परिसरात सोलर पॅनलद्वारे वीज निर्मिती याबाबतही माहिती देण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाच्या संधी मिळणार आहेत.

तालुक्याला ‘नंबर वन’ करण्याचा निर्धार –

“माझे स्वप्न आहे की, जामनेर तालुका केवळ सिंचनच नाही, तर सर्वच क्षेत्रांमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर जावा,” असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. या महत्त्वाकांक्षी जलसंधारण योजनेमुळे भविष्यात जामनेर तालुका कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद –

या ऐतिहासिक कार्यक्रमास आमदार मंगेश चव्हाण, स्थानिक लोकप्रतिनिधी, तापी पाटबंधारे विभाग महामंडळाचे कार्यकारी संचालक पी.के. पवार, मुख्य अभियंता जे.डी. बोटकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जलसंपदा आणि महसूल विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. लाभार्थी शेतकऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.

जामनेर तालुक्यात जलक्रांती घडविणाऱ्या या अभिनव प्रकल्पामुळे येत्या काही वर्षांत शेतीला भरघोस फायदा होईल आणि तालुका सुजलाम-सुफलाम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: girish mahajanjamnerwaterWater Resources Minister

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page