• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

कामगार किट हे फक्त पाचोरा- भडगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठीच; गावनिहाय होणार वाटप, आमदार किशोर आप्पा पाटील यांची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 10, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
कामगार किट हे फक्त पाचोरा- भडगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठीच; गावनिहाय होणार वाटप, आमदार किशोर आप्पा पाटील यांची माहिती

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 10 एप्रिल : महाराष्ट्र शासनाच्यावतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांड्यांचे वाटप करण्यात येते. अशातच पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे गृहपयोगी भांडे वाटप केले जात होते. याठिकाणी पाचोरा तालुक्याबाहेरील मोठ्या प्रमाणात बांधकाम मजुर हे भांडे घेण्यासाठी येत असल्याने गर्दी होत होती.

दरम्यान, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी हे भांडे वाटप तात्काळ थांबवले. तसेच वरखेडी येथे वाटप होणारे कामगार किट हे फक्त पाचोरा-भडगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांना देण्यात यावे आणि त्याचे वाटप गावनिहाय करण्यात यावे, अशा सूचना आमदार पाटील यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या. पाचोऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार किशोर आप्पा पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती –
आमदार किशोर आप्पा पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या आधी भडगाव बाजार समितीच्या परिसरात पाचोरा-भडगाव तालुक्यातील निर्णय घेतला. परंतु, अनेकांना भांडेवाटप करण्यात आल्यानंतर ते बंद करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी या गृहपयोगी भांड्यांचे वाटप करायला सुरूवात करण्यात आली आहे.

आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की, गेल्या दोन-तीन दिवसांपुर्वी वरखेडी येथे बांधकाम कामगारांसाठी भांडे वाटपाची सुरूवात करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी पाचोरा तालुक्या बाहेरूनही काही जण येत होते आणि वेगवेगळ्या अफवांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी देखील त्याठिकाणी होत होती. याची तात्काळ दखल घेऊन ते भांडे वाटप बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या.

कामगरांच्या किट वाटपासाठी आमदारांनी आखला नियोजनबद्ध कार्यक्रम –
दरम्यान, आज सकाळी मुंबईहून परत आल्यानंतर मी भांडेवाटपासंदर्भात महत्वाच्या सूचना केल्या. यानुसार, पाचोरा-भडगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठीच हे भांडे वाटप केले जाणार आहे. पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील बांधकाम मजुरांच्या भांडे वाटपासाठी सुटसूटीत कार्यक्रम आखला असून दोन महिन्यांच्या कालबद्ध वेळेत भांड्यांचे वाटप केले जाणार आहे.

खरंतर, ज्या संख्येत ऑनलाईन नोंदणी झाली तेवढे भांडे दुसऱ्या दिवशी येतात. पण, ते ऑनलाईन होणं गरजेचे आहे. आता ऑनलाईनमध्ये देखील मर्यादा आली असून फक्त 400 कामगारांची यामध्ये नोंदणी केली जाते. म्हणून कोणत्या गावात किती मजूर आहेत..याची आकडेवारी सध्यास्थितीत नाहीये. यामुळे उद्या 11 एप्रिलपासून ते 25 जून पर्यंत पाचोरा-भडगाव तालुक्यातील गावांमधील नोंदणीकृत बांधकाम मजुरांना गावनिहाय गृहपयोगी भांडेवाटप केले जाणार असल्याची माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.

पहिल्या आठवड्यात ‘या’ गावांतील बांधकाम मजुरांना होणार भांडेवाटप –

  • शुक्रवार – 11 एप्रिल – वरखेडी खुर्द आणि बुद्रूक
  • शनिवार – 12 एप्रिल – भोकरी
  • रविवार – 13 एप्रिल – वडगाव (आंबे), कोकडी जोगे, तांडा नं-1 व 2
  • सोमवार – 14 एप्रिल – लासुरे, सावखेडा बु.
  • मंगळवार – 15 एप्रिल – कजगाव ता. भडगाव
  • बुधवार – 16 एप्रिल – वाडे ता. भडगाव
    गुरूवार – सुट्टी

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीची उपशाखा म्हणजेच वरखेडी येथे बाजार समितीच्या जागेवर सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान हे किट वाटप केला जाणार आहे. तसेच गुरूवारी सुटी असणार आहे.

आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आवाहन –
पाचोरा-भडगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडेवाटप करण्यासाठी 11 एप्रिल ते 25 जून पर्यंत योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून त्यानुसार भांडे वाटप केले जाणार आहे. यामुळे पाचोरा तसेच भडगाव तालुक्याबाहेरील बांधकाम मजुरांनी याठिकाणी भांडे घेण्यासाठी येऊन त्रास करून घेऊ नये तसेच गर्दी करू नये, असे आवाहन आमदार पाटील यांनी यावेळी केले.

हेही वाचा : “जनतेच्या शासनाकडून मोठ्या अपेक्षा, म्हणून….” मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांना महत्वपुर्ण सूचना

बातमी शेअर करा !
Share
Tags: construction labor kitsmla kishor appa patilpachora latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page