जळगाव, 28 सप्टेंबर: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय रक्षा खडसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे 10 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गरजू नागरिकांना विविध वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. सामाजिक बांधिलकीतून देण्यात आलेल्या या योगदानामुळे गरजू रुग्णांना मदत मिळण्यास हातभार लागणार आहे.
हेही वाचा: रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन






