• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“एन्काऊंटरची चर्चा बंद दाराआड…10 लाख रूपये मला पाठवले”, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंच्या आरोपांनी खळबळ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 18, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“एन्काऊंटरची चर्चा बंद दाराआड…10 लाख रूपये मला पाठवले”, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंच्या आरोपांनी खळबळ

बीड, 18 एप्रिल : बीड जिल्हा पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेने केलेल्या वेगवेगळ्या आरोपांवरून खळबळ उडालीय. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची चर्चा ही बंद दाराआड झाली होती असा आरोप कासलेने केलाय. तर दुसरीकडे निवडणुकीच्या वेळी मला मॅनेज करण्यासाठी माझ्या बँक खात्यात धनंजय मुंडे यांच्या माणसांनी 10 लाख रूपये पाठवले होते, असाही आरोप रणजित कासलेने केलाय. दरम्यान, त्याच्यावर बीड पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने तो पोलिसांना शरण जाणार असल्याचेही त्याने पुण्यात माध्यमांसोबत बोलताना सांगितले.

मला 10 लाख रूपये दिले – रणजित कासले
रणजित कासलेने एन्काऊंटर तसेच निवडणुकीसंदर्भातील दोन आरोप केले आहेत. त्यापैकी एक आरोप म्हणजे निवडणुकीच्या काळात त्याच्या बँक खात्यात 10 लाख रूपये देण्यात आल्याचा. आले. याबाबत रणजित कासले म्हणाला की, धनंजय मुंडे यांच्याकडून ते पैसे माझ्याकडे आले. धनंजय मुंडे यांच्या ज्या पैशांच्या गाड्या मी पकडल्या होत्या. त्यासाठी मी शांत राहायचे आणि मतदानाच्या कालावधीत संध्याकाळी ईव्हीएमसोबत जी छेडछाड होईल, त्याठिकाणी दुर्लक्ष करायचे यासाठी मला ती 10 लाख रूपये रक्कम देण्यात आली होती.  ज्या दिवशी मतदान होते, त्या दिवशी महादेव कराड आणि काळे हे पार्टनर असलेल्या संत बाळूमामा कंस्ट्रक्शन कंपनीच्या खात्यातून माझ्या बँक खात्यात 10 लाख रुपये आले, असा दावा कासले यांनी केला. यापैकी मी साडे सात लाख रूपये परत केले आणि अडीच लाख रूपये खर्च केले. यासोबत धनंजय मुंडे यांनी इतरही अधिकाऱ्यांना पैसे देण्यात आल्याचे कासलेने सांगितले.

एन्काऊंटरची चर्चा बंद दाराआड – रणजित कासले
रणजित कासलेने वाल्मिक कराडच्या एन्काऊंटर करण्याबाबतच्या ऑफरबद्दल आरोप करताना सांगितलं की, ओरीपच्या एन्काऊंटरबाबत कुठला गृहमंत्री काही लेखीस्वरूपात आदेश देत नसतात. यासाठी चर्चेतूनच या गोष्टी घडत असतात. यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षक यांच्या ऑफिसला एन्काऊंटरबाबत चर्चा झाली. त्यांना जे अधिकारी योग्य वाटतात ते अधिकारी त्यानी बोलवून घेतले. किमान 10 ते 12 अधिकारी असतील ज्यांच्यासोबत त्यांनी याबाबत चर्चा केली. ज्यावेळी त्यांनी मलाही बोलवून घेतलं..त्यावेळी मी त्यांना स्पष्ठ शब्दात नकार दिला. माझ्याकडून हे पाप आताच नाही तर कधीही होणार नाही. उज्ज्वल निकमसारखे वकील या प्रकरणात आहेत. वाल्मिक कराडला न्यायदेवता फाशीची शिक्षा देईल मी का त्यांचं एन्काऊंटर करू, असे त्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितल्याचे रणजित कासलेने सांगितले. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांना टॅब दिला असल्याचाही दावा, रणजीत कासलेने केलाय.

नेमकं प्रकरण काय? –
लातूरमध्ये अमित देशमुख हे अकार्यक्षम नेतृत्व असून त्यांच्याविरोधात कुत्र जरी उभं केलं तरी ते निवडून येऊ शकतं, असं वक्तव्य गेल्या एक महिन्यांपुर्वी रणजित कासलेने केले होते. दरम्यान, त्याने गेल्या दोन-तीन दिवसांपुर्वी बीड पोलिसांना आव्हान दिल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून तो वेगवेगळ्या ठिकाणी जात होता. दरम्यान, आज तो बीड पोलिसांना शरण येणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

तर दुसरीकडे सायबर क्राईम विभागात कार्यरत असताना एका प्रकरणासंदर्भात याआधीच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालीय. असे असताना त्याने वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसंदर्भात ऑफर दिली गेल्याचे तसेच निवडणुकीच्या काळात 10 लाख रूपये मला दिले असल्याचा आरोप केलाय. दरम्यान, बीड जिल्हा पुन्हा एकदा यावरून चर्चेत आलाय.

हेही वाचा : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय बालिका ठार; आमदार चंद्रकांत सोनवणेंनी दिली घटनास्थळी भेट अन् दिल्या महत्वाच्या सूचना

बातमी शेअर करा !
Share
Tags: beed policeranjit kaslranjit kasle allegationssuspended police officer ranjit kaslesuvarna khandesh livewalmik karad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा अंदाज

मोठी बातमी! २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा अंदाज

June 19, 2026
शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन; शिवसेनेच्या दोन्ही गटांची आज तोफ धडकणार; ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर सभांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन; शिवसेनेच्या दोन्ही गटांची आज तोफ धडकणार; ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर सभांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

June 19, 2026
धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

June 18, 2026
विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

June 18, 2026
अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page