• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

कायद्याची राखण करणाऱ्या पोलिसाचाच चोरीच्या गुन्ह्यात सहभाग; चोरांच्या टोळीत चोपड्यात सापडला अन् पोलिसांनी केली अटक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 18, 2025
in चोपडा, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
कायद्याची राखण करणाऱ्या पोलिसाचाच चोरीच्या गुन्ह्यात सहभाग; चोरांच्या टोळीत चोपड्यात सापडला अन् पोलिसांनी केली अटक

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 18 एप्रिल : कायद्याची राखण करण्याची जबाबदारी ही पोलिसांवर असते. मात्र, कायद्याची राखण करणारा पोलीस उपनिरीक्षक हा चोरीच्या गुन्ह्यात सहभाग सहभाग असेल, यावर विश्वास बसणार नाही. मात्र, हे घडलंय चोपड्यात. चोपड्यात पोलीस उपनिरीक्षकासह तीन चोरांना चोरी करून पडून जाताना अटक करण्यात आली आहे. चोपडा पोलिसांनी ही कारवाई करत चोघांना अटक केलीय.

प्रल्हाद पिराजी मांटे (58, रा.जालना) तर अटकेत असलेल्या जालना पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तसेच अंबादास सुखदेव साळेकार (40, बुलढाणा), रईफ शेख अहमद (45, म्हाळस, जावळा जि. बीड), श्रीकांत भीमराव बघे (27, खामगाव) असे इतर तीन आरोपींचे नावे आहेत.

नेमकं प्रकरण काय? –
चोपडा बस स्थानकामध्ये बसमध्ये चढतांना एका 76 वर्षीय वृद्धाची 65000/- रुपये किमतीची रक्कम खिशातुन चोरी केल्याची घटना 16 एप्रिल रोजी घडली होती. दरम्यान, गुन्हा केल्यानंतर सदर आरोपीतांनी बस स्टँड परिसरातुन पळ काढला होता. याप्रकरणी चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर, तात्काळ चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांचे पथक सदर आरोपींचा शोध सुरू केला होता.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडील पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागील भागात स्मशानभुमी जवळ सापळा लावुन चार आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये पोलीस उपनिरीक्षकाचा सहभाग दिसून आला. यावेळी पोलिसांना आरोपीकडे सखोल विचारपुस केली असता त्यांनीच सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.

आरोपींकडून मुद्देमाल जप्त –
सदर आरोपीतांकडुन खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला. रोख रक्कम 15 हजार 100 रुपये तसेच त्यांचेकडील वापरते एकुन चार मोबाईल व एक टाटा इंडिका कंपनीची चारचाकी गाडी जिची किंमत 3 लाख 50 हजार असे मिळुन सदर आरोपीतांकडुन एकुन 4 लाख 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करीत आहे.

चक्क पोलिस उपनिरीक्षकच बसस्थानकावर चोरी करणाऱ्या टोळीचा आला संपर्कात –
अटक केलेल्या आरोपींनी वेगवेगळ्या शहरांमधील बस स्टँड जाऊन तेथील गर्दीचा फायदा घेऊन वयोवृद्ध इसमांचे खिशातील रक्कम चोरी करुन नंतर तेथुन पसार होण्याची त्यांची कार्यपद्धती समोर आली आहे. त्यांचेपैकी आरोपी क्रमांक 01) प्रल्हाद पिराजी मान्टे हा जालना पोलीस दलामध्ये श्रेणी पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असल्याचे सदर तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच तो गेल्या काही वर्षांपासूनच बसस्थानकावर चोरी करणाऱ्या टोळीचा संपर्कात आल्याचे समजते.

यांनी केली कारवाई –
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग अण्णासाहेब घोलप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव बबन आव्हाड तसेच पोलीस निरीक्षक चोपडा शहर मधुकर साळवे, यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश वाघमारे, पोहेकॉ विलेश सोनवणे, पोहेकॉ दिपक माळी, पोहेकॉ रविंद्र पाटील, पोना हेमंत पाटील यांनी पार पाडली आहे.

हेही वाचा : “….त्यानंतरच पात्र अर्जधारकांना आधार किटचे वाटप केले जाणार!” आपले सरकार सेवा केंद्र धारकांसाठी नेमकी बातमी काय?

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page