• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

Nashik Crime : साखरपुड्यात होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मारली मिठी अन् लग्नाच्याच दिवशी होणाऱ्या नवऱ्याने केली आत्महत्या

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 19, 2025
in क्राईम, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Nashik Crime : साखरपुड्यात होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मारली मिठी अन् लग्नाच्याच दिवशी होणाऱ्या नवऱ्याने केली आत्महत्या

नाशिक, 19 एप्रिल : राज्यात गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या घटना समोर येत असतानाच एक खळबळजनक बातमी समोर आलीय. साखरपुड्यात होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठी मारल्याने तसेच नियोजित वधूकडून, लग्न कर, नाही तर खोट्या पोलिस केसमध्ये अडकवण्याची सातत्याने धमक्या दिल्याने नाशिकमध्ये आयकर अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून हरेकृष्ण पाण्डेय (रा. देवरिया, उत्तर प्रदेश) असे मयत अधिकाऱ्याचे नाव आहे.

नेमकी बातमी काय? –
नाशिकमधील बुरकुले मंगल कार्यालयाजवळील इन्कम टॅक्स कॉलनीत हा प्रकार उघडकीस आला. हरेराम पाण्डेय (रा. देवरिया, उत्तर प्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हरेकृष्ण पाण्डेय हे नाशिकमध्ये आयकर विभागात कार्यरत होते. असे असताना त्यांचा वाराणसी येथील मोहिनी नामक मुलीशी साखरपुडा झाला होता. या कार्यक्रमात मोहिनीने तिचा प्रियकर सुरेश पाण्डेय याला मिठी मारली होती. दरम्यान, तिचे प्रेमसंबंध हरेकृष्णला कळल्यानंतर प्रियकराला सोडून देण्याचे होणाऱ्या पत्नीला सांगितले.

अन् उचललं टोकाचं पाऊल –
मात्र, तिने मी त्याला सोडणार नाही आणि तू जर माझ्यासोबत लग्र केले नाही तर तुझ्यासह कुटुंबीयांवर हुंडा मागितल्याची तक्रार दाखल करेल. अशी धमकी आयकर अधिकारी हरेकृष्णला दिली होती. दरम्यान, हरेकृष्ण वैफल्यग्रस्त झाला होता. त्यातून त्याने राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

तिघांविरोधात गुन्हा दाखल –
याप्रकरणी नाशिकमधील अंबड पोलिसांत मोहिनी पांडे, तिचा प्रियकर सुरेश पांडे आणि त्याचा साथीदार मुनेंद्र पांडे या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे तिघेही फरार झाल्याचे समजते. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. तर दुसरीकडे हरेकृष्ण पाण्डेय यांचा शुक्रवारी 18 एप्रिल रोजी वाराणसी येथे विवाह होणार होता. मात्र, लग्न होण्यापूर्वीच त्यांनी आपली जीवन यात्रा संपवल्याने इन्कमटॅक्स विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : ‘एक तालुका एक कृषी उत्पन्न बाजार समिती’, जळगाव जिल्ह्यात तीन नव्या बाजार समित्यांची होणार निर्मिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: ambad police stationharekrishna pandeyincome tax officer suicide casenashik crimesuicide in nashik

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

August 31, 2026
विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

August 31, 2026
माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

August 30, 2026
नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page