• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Jalgaon Breaking!, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित दादा गटाकडून मोठा धक्का; गुलाबराव देवकर, सतीश अण्णांसह माजी आमदारांचा मुंबईत पक्षप्रवेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 3, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Jalgaon Breaking!, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित दादा गटाकडून मोठा धक्का; गुलाबराव देवकर, सतीश अण्णांसह माजी आमदारांचा मुंबईत पक्षप्रवेश

मुंबई, 3 मे : गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडणार असल्याचे बोलले जात होते. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माजी मंत्री सतीश अण्णा, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. आज दुपारी मुंबईत हा पक्षप्रवेश पार पडलाय.

देवकरांसह चौघांचा मुंबईत पक्षप्रवेश –

माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे यांनी आज मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी खासदार सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते. दरम्यान, कधी काळच्या मात्तबर नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांना साथ दिल्याने अजित दादांच्या राष्ट्रवादीला जळगाव जिल्ह्यात बळकटी येण्याची शक्यता आहे.

विधानसभेत पराभव अन् आता थेट अजित दादा गटात –

गुलाबराव देवकर –

गुलाबराव देवकर हे माजी मंत्री असून मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुती सरकारमधील विद्यमान मंत्री तसेच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्याविरोधात जळगाव ग्रामीण मतदारसंघात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गुलाबराव देवकर यांचा दारूण पराभव झाला होता. दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर देवकर यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज प्रवेश केलाय.

डॉ. सतीश पाटील –

पारोळ्याचे डॉ. सतीश पाटील हे माजी मंत्री असून शरद पवार गटाचे ते खंदे समर्थक मानले जात होते. मात्र, मागील आठवड्यात त्यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीत निर्णय घेतला. तत्पुर्वी, त्यांनी मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार अमोल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. एरंडोल-पारोळा मतदारसंघात अमोल पाटील, भाजपमधून बंडखोरी केलेले ए.टी. पाटील, अपक्ष उमेदवार भगवान महाजन, डॉ. सतीश पाटील यांच्यात चुरस निर्माण झाली होती. मात्र, अमोल पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्याने डॉ.सतीश पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, आता त्यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.

दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर दिलीप वाघ हे भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितले जात होते. याबाबत त्यांना स्वतः माध्यमांसोबत प्रतिक्रिया दिली होती. मात्र, गुलाबराव देवकर तसेच डॉ. सतीश पाटील यांच्यासह त्यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादी जाण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईत आज वाघ यांचा देखील पक्षप्रवेश पार पडला.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawarajit pawar ncpdr satish patilgulabrao deokarmumbaisatish patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! पद्मालय शिवारातील ‘त्या’ जळालेल्या मृतदेहाच्या खुनाचा उलगडा; तृतीयपंथी महिलेची हत्या झाल्याचे उघड, आरोपी अटकेत

धक्कादायक! पद्मालय शिवारातील ‘त्या’ जळालेल्या मृतदेहाच्या खुनाचा उलगडा; तृतीयपंथी महिलेची हत्या झाल्याचे उघड, आरोपी अटकेत

February 6, 2026
Video | ‘अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?’ विमान अपघाताबाबत खासदार बजरंग सोनवणे यांना शंका, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?’ विमान अपघाताबाबत खासदार बजरंग सोनवणे यांना शंका, नेमकं काय म्हणाले?

February 6, 2026
जळगाव महापालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज सुरेश चौधरी यांची निवड

जळगाव महापालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज सुरेश चौधरी यांची निवड

February 6, 2026
अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; कार्यकर्त्यांसाठी केलं महत्वाचं आवाहन

अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; कार्यकर्त्यांसाठी केलं महत्वाचं आवाहन

February 6, 2026
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026: गोंदेगाव–बनोटी येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या जाहीर सभा संपन्न

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026: गोंदेगाव–बनोटी येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या जाहीर सभा संपन्न

February 5, 2026
Video | शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

Video | शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

February 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page