• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 21, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

जळगाव, 21 सप्टेंबर: जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, वीजतारा, वीज साहित्य तसेच घरफोड्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हाभर विशेष मोहीम राबवावी. वारंवार चोरी होणाऱ्या भागांची स्वतंत्र नोंद करून तेथे रात्रीची गस्त वाढवावी आणि पोलीस व महावितरणने समन्वयाने ठोस व परिणामकारक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील वीज तारा व विद्युत साहित्य चोरीस आळा घालण्यासाठी तात्काळ उपयोजना करण्याबाबत बैठक घेण्यात आली त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रावेर, मुक्ताईनगर व बोदवड परिसरातील वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता बैठकीत मांडली. शेतकऱ्यांच्या मागणीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली.

बैठकीत जिल्ह्यासह रावेर तालुक्यातील वनगाव,तासखेडा परिसरातील नदीकाठावरील विद्युत मोटारींच्या चोऱ्या, खिर्डी–निंबोल भागातील घरफोड्या, मुक्ताईनगर तालुक्यातील वीजतारा व वीज साहित्याच्या चोऱ्या तसेच बोदवड शहरातील घरफोड्यांचा आढावा घेण्यात आला.

शेतकऱ्याची मोटार चोरीला जाणे म्हणजे केवळ एका वस्तूची चोरी नाही. मोटार गेली की त्याचे सिंचन थांबते, पीक धोक्यात येते आणि आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यावर पुन्हा आर्थिक भार पडतो. त्यामुळे अशा घटनांकडे किरकोळ गुन्हा म्हणून पाहू नका, तसेच चोरीच्या घटनांमध्ये केवळ आरोपी पकडण्यापुरता तपास मर्यादित ठेवू नका. चोरीचा माल शेवटी कुठे जातो, तो कोण खरेदी करतो किंवा अन्य माध्यमातून त्याची विल्हेवाट कशी लावली जाते आणि यामागे एखादी संघटित टोळी अथवा साखळी कार्यरत आहे का ? याच्या मुळापर्यंत जा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी पोलिसांना दिले.

रावेर–मुक्ताईनगर–बोदवड भागातील वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांचा एकत्रित तपास करण्यासाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली विशेष पथक कार्यरत करावे. चोरीप्रवण ठिकाणे निश्चित करून नियमित पेट्रोलिंगबरोबरच संशयित व्यक्ती व वाहनांवर लक्ष केंद्रित करावे. नदीकाठच्या तसेच नदीलगतच्या गावांमध्ये आवश्यक असल्यास बोटीद्वारे गस्त घालण्याची व्यवस्था करा. चोरी रोखण्यासाठी जे आवश्यक आहे ते करा, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री पाटील यांनी यावेळी  दिल्या.

महावितरणने वारंवार वीजतारा व वीज साहित्य चोरी होणारे मार्ग आणि संवेदनशील ठिकाणे निश्चित करावीत. अशा भागांची माहिती पोलिसांना उपलब्ध करून द्यावी. पोलीस व महावितरणने संयुक्त यंत्रणा उभी करून तातडीने माहितीची देवाणघेवाण करावी आणि चोरीच्या घटनांवर ‘ॲक्शन मोड’मध्ये काम करावे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा प्रश्न मांडताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, विद्युत मोटारी, वीजतारा व साहित्य चोरीला गेल्यानंतर शेतकऱ्याला एकाच वेळी आर्थिक फटका आणि सिंचनाची अडचण सहन करावी लागते. त्यामुळे केवळ गुन्हा नोंदवून थांबण्याऐवजी चोरी करणाऱ्यांपासून ते चोरीचा माल विकत घेणाऱ्यांपर्यंत संपूर्ण साखळीवर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

पोलीस आणि महावितरण विभागाने परस्परांवर जबाबदारी न ढकलता समन्वयाने काम करावे. वारंवार तारा चोरी होणाऱ्या भागात संयुक्त गस्त, संशयित हालचालींवर नजर आणि स्थानिक यंत्रणेकडून तातडीने माहिती मिळविण्याची व्यवस्था उभी करावी. “शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळेल अशी कारवाई दिसली पाहिजे,” अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार चंद्रकांत पाटील यांनी या विषयाशी संबंधित विविध मुद्दे बैठकीत मांडले.

यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी जिल्ह्यातील कॉपर चोरी, विद्युत मोटारी व वीजतारा चोरीच्या घटनांबाबत सविस्तर सादरीकरण केले. जिल्ह्यात कोणकोणत्या भागांत अशा चोरीच्या घटना घडल्या आहेत, त्यांचे स्वरूप, संवेदनशील ठिकाणे, पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना तसेच या घटनांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी महावितरणकडून अपेक्षित असलेले सहकार्य याची माहिती त्यांनी प्रेझेंटेशनद्वारे बैठकीत मांडली. चोरीच्या घटनांचा मागोवा घेणे, संशयितांवर लक्ष ठेवणे आणि पोलीस व महावितरण यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीनेही त्यांनी विविध उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक, संदीप गावित, वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा: अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

बातमी शेअर करा !
Share
Tags: guardian minister gulabrao patiljalgaon policemahavitaranmarathi newssuvarna khandesh livetheft incident

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

September 21, 2026
जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

September 21, 2026
जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

September 21, 2026
‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

September 21, 2026
भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

September 21, 2026
अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

September 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page