• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

गेल्या चार-पाच वर्षांत ३०१ वाहनांसाठी ११.५२ कोटींचा निधी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 21, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव, 21 सप्टेंबर: जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेचे दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार उपलब्ध करून देण्यात आलेल्या १२ नवीन महिंद्रा बोलेरो निओ श्रेणीतील चारचाकी वाहनांचे लोकार्पण पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज येथील पोलिस आयुक्तालयातील आवारात करण्यात आले.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, रेल्वे पोलिस निरीक्षक प्रशांत सुगरवार, राहुल गायकवाड, मोटार परिवहन विभाग अधिकारी प्रवीण तायडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नव्या वाहनांमुळे पोलीस ठाण्यांची नियमित गस्त, बंदोबस्त तसेच आपत्कालीन प्रसंगी घटनास्थळी तातडीने पोहोचण्यास मदत होणार आहे. सन २०२६-२७ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागासाठी एकूण १४ नवीन चारचाकी वाहनांना १ कोटी ४४ लाख २९ हजार २७८ रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी जळगाव पोलीस विभागासाठी १० तसेच चाळीसगाव व भुसावळ लोहमार्ग पोलिसांसाठी प्रत्येकी एक अशा १२ वाहनांचे आज लोकार्पण करण्यात आले. या १२ वाहनांची प्रत्यक्ष खरेदी किंमत १ कोटी १६ लाख १६ हजार रुपये आहे. उर्वरित दोन वाहने बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकासाठी आहेत.

‘पोलीस विभागाच्या गरजांना सातत्याने प्राधान्य’ –

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दलाकडे सक्षम मनुष्यबळाबरोबरच पुरेशी वाहने आणि आधुनिक साधनसामग्री असणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून पोलीस विभागाच्या गरजांना सातत्याने प्राधान्य देत निधी उपलब्ध करून दिला आहे. नव्या वाहनांमुळे पोलिसांची गस्त अधिक प्रभावी होऊन नागरिकांच्या मदतीच्या हाकेला अधिक जलद प्रतिसाद देता येणार आहे.”

‘पोलीस यंत्रणेवर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी’ –

सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेवर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी असल्याचे नमूद करताना पाटील म्हणाले की, “सण-उत्सव शांततेत आणि आनंदात पार पडावेत यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या कामकाजासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी असून, पोलीस दलाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत.”

मागील चार-पाच वर्षांत ३०१ वाहनांसाठी ११.५२ कोटी –

जिल्हा वार्षिक योजनेतून गेल्या चार ते पाच वर्षांच्या कालावधीत पोलीस विभागाच्या वाहन व्यवस्थेच्या बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. या कालावधीत ११३ चारचाकी आणि १८८ दुचाकी अशी एकूण ३०१ वाहने पोलीस विभागासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी ११ कोटी ५२ लाख ३१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस ठाणे व विविध शाखांच्या क्षेत्रीय कामकाजासाठी वाहनांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले की, “जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार आणि पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र लक्षात घेता वाहनांची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. नव्या वाहनांमुळे पेट्रोलिंग, बंदोबस्त तसेच तातडीच्या घटनांना प्रतिसाद देण्याची क्षमता वाढणार आहे. विशेषतः सण-उत्सवाच्या काळात ही वाहने पोलीस यंत्रणेसाठी उपयुक्त ठरतील.” पोलीस दलाच्या गरजांना सातत्याने प्रतिसाद देत वाहनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले.

हेही वाचा: ‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

बातमी शेअर करा !
Share
Tags: bolero neoguardian minister gulabrao patiljalgaon newsjalgaon policesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

November 5, 2026
ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार, लासगावातील धक्कादायक वास्तव समोर

ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार, लासगावातील धक्कादायक वास्तव समोर

November 4, 2026
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 250 युवकांनी घेतली लोकशाहीची शपथ

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 250 युवकांनी घेतली लोकशाहीची शपथ

November 4, 2026
अतिक्रमणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करा; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये द्या, पाचोऱ्यात काँग्रेसची मागणी

अतिक्रमणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करा; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये द्या, पाचोऱ्यात काँग्रेसची मागणी

November 4, 2026
“राजकीय दबावातून आणि ‘अदृश्य शक्तींच्या’ सांगण्यावरून माझा अर्ज बाद केला” – सुमित पाटील

“राजकीय दबावातून आणि ‘अदृश्य शक्तींच्या’ सांगण्यावरून माझा अर्ज बाद केला” – सुमित पाटील

November 4, 2026
विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – मंत्री चंद्रकांत पाटील

November 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page