जळगाव, 15 मे : जळगाव जिल्ह्यातील विविध भागात आतापर्यंत अवकाळी पावासाने हजेरी लावलीय. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असताना आता खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामालाही वेग आला आहे. दरम्यान, यंदा जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा समाधानकारक पाऊस राहिल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलाय. यामुळे शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करता 1 जूननंतरच पेरणी करण्यास सुरूवात करावी, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.
लवकर पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट? –
जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात पुढील काही दिवसांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे अवकाळी पाऊस हा पेरणीसाठी पुरेसा नाहीये. शेतकऱ्यांनी जर याच कालवधीत पेरणी केली आणि पुढील काही दिवसांत जर मान्सूनच्या पावसांत खंड पडला तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांनी 1 जूननंतरच पेरणी करायला पाहिजे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
खरीप हंगाम आढावा बैठकीचे आयोजन –
जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत उद्या 16 मे रोजी खरीप हंगाम आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या आढाव बैठकीत बियाणे, खतांचा आढावा तसेच शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाबाबत आवाश्यक असलेल्या मार्गदर्शक सूचना याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Jalgaon News : डिएपी खतास पर्यायी खतांचा वापर करावा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा नेमका काय सल्ला?