• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धरणगाव

छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिरांतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 23, 2025
in धरणगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिरांतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

धरणगाव, 23 मे : सामान्य जनतेच्या अडचणी तत्काळ मार्गी लागाव्यात, यासाठी शासनातर्फे आयोजित करण्यात येणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिरे’ ही एक सकारात्मक आणि लोकाभिमुख पावले असून, प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावे, हा या उपक्रमामागील खरा उद्देश आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील शासकीय विश्रामगृहात महसूल विभागाच्या वतीने आयोजित शिबिरात विविध शासकीय योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला. शिबिरात शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गरजू नागरिक अशा सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

शिबिरातील महत्त्वाचे उपक्रम व लाभ :
शिबिरात एकूण 885 शासकीय दाखले (जात, उत्पन्न, शैक्षणिक, नॉन क्रिमीलेयर) वितरित करण्यात आले. ‘सुलभ शेतकरी योजना’ अंतर्गत तालुक्यातील 1359 व पाळधी मंडळातील 252 गटांमध्ये ‘तुकडा’ शेरा कमी करून सुधारित सातबारा उतारे शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आले. ‘जिवंत सातबारा मोहिमे’ अंतर्गत 437 मयत खातेदारांच्या वारसांची नोंद घेऊन फेरफार दाखले तयार करण्यात आले.


‘संजय गांधी निराधार योजना’ अंतर्गत 16,176 लाभार्थ्यांपैकी 14,000 जणांना थेट बँक खात्यात लाभ जमा करण्यात आला असून उर्वरित लाभार्थ्यांचे कामकाज शिबिरात सुरू आहे. महिला शेतकरी मुक्ताबाई अर्जुन सूर्यवंशी यांना यांत्रिक सहाय्य म्हणून 1.25 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. घरकुल योजनेंतर्गत तालुक्यातील 4,732 लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाच्या निर्णयानुसार प्रारंभी 20 लाभार्थ्यांना वाळू वितरित करण्यात आली.

प्रशासनाचा लोकांशी थेट संवाद –
शिबिराच्या माध्यमातून प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचले असून, नागरिकांच्या अडचणी तत्काळ मार्गी लावण्यात आल्या. प्रशासन व जनतेतील विश्वास दृढ करणारा हा उपक्रम ठरला.

उपस्थित मान्यवर –
या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच विजय पाटील, माजी उपसभापती डी. ओ. पाटील, गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, तालुका कृषी अधिकारी किरण देसले, उपअभियंता एस. डी. पाटील, शेतकी संघाचे संजय महाजन, माजी सरपंच अरुण पाटील, प्रशांत झंवर, आबा माळी, कल्पेश कोळी, महेश शिंपी, समाधान माळी, अनिल माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी केले, तर आभार प्रभारी तहसीलदार संदीप मोरे यांनी मानले.

हेही वाचा : Video : ”त्या’ गरिब माणसाला निलंबित का केलं?’, खोतकरांच्या प्रतिक्रियेनंतर संजय राऊतांचा खोचक सवाल

बातमी शेअर करा !
Share
Tags: chhatrapati shivaji maharaj self-samadhan campminister gulabrao patilsuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

April 14, 2026
जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; 1 लाख रूपयांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला पकडले रंगेहाथ

जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; 1 लाख रूपयांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला पकडले रंगेहाथ

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page