जळगाव, 2 मे : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 मध्ये ज्वारी, मका व बाजरी या भरडधान्यांची खरेदी करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख 15 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 9337 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
जळगांव जिल्ह्यात पणन महासंघामार्फत अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगांव, एरंडोल, पाळधी, म्हसावद, जळगांव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगांव व चाळीसगांव असे एकूण 18 खरेदी केंद्र कार्यरत राहणार आहेत.
रब्बी हंगामातील हमीभाव पुढीलप्रमाणे आहेत :
- ज्वारी : रुपये 3371/- प्रति क्विंटल
- मका : रुपये 2225/- प्रति क्विंटल
- बाजरी : रुपये 2625/- प्रति क्विंटल
- खरेदी कालावधी 1 जून 2025 ते 30 जून 2025 दरम्यान राहणार आहे.
तरी शेतकरी बंधुंनी ज्वारी, मका व बाजरी नोंदणी खरेदीचा लाभ घ्यावा. ऑनलाईन नोंदणी करीता, आधारकार्ड, बँक पासबूक व ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला 7/12 उतारा, 8अ इ. कागदपत्रे घेवून वरील खरेदी केंद्रांवर चना, ज्वारी, मका व बाजरी नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय संचालक संजय वामनराव सावकारे, संचालक संजय मुरलीधर पवार व एस. एस. मेने (प्र.जिल्हा पणन अधिकारी, जळगांव) यांच्या वतीने करण्यात येत आहे.
हेही वाचा : लासगावचे सुपूत्र साजिद शेख भारतीय सैन्यदलातून निवृत्त, पालीमध्ये भव्य सेवापूर्ती सोहळ्याचे आयोज