• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात भेट; अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात जाणारे ते ठरले राज्याचे पहिले मुख्यमंत्री

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 7, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात भेट; अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात जाणारे ते ठरले राज्याचे पहिले मुख्यमंत्री

गडचिरोली, 7 जून : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 6 जून रोजी थेट महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात पोहोचले. या अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात जाणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यांच्या उपस्थितीत कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या 12 नक्षलवाद्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करली. शस्त्रांसह शरणागती पत्करणारे अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे.

बुलेटप्रुफ वाहनांसह 19 वाहने पोलिसांच्या सेवेत –
यापूर्वी शरणागती पत्करलेल्या पूर्वीच्या 13 नक्षल्यांचा सामूहिक विवाह सोहळाही गडचिरोलीत आयोजित करण्यात आला. त्याला हजेरी लावत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवदाम्पत्यांना नवजीवनाच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी त्यांनी सी-60 जवानांचा सत्कार केला आणि त्यांना अत्याधुनिक अशी एके-103 शस्त्रे आणि एएसएमआय पिस्तुल, बुलेटप्रुफ जॅकेट्स प्रदान केली. त्यांच्या शौर्याची प्रशंसाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. जिल्हा नियोजन विकास निधीतून 19 चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्यातील काही बुलेटप्रुफ वाहने आहेत. त्यांच्या चाव्या त्यांनी पोलिस दलाकडे सुपूर्द केल्या.

या दौऱ्यात वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ मिलिंद नरोटे, पोलिस उपमहानिरीक्षक अंकीत गोयल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल आदी मान्यवर उपस्थित होते.

सी-60 जवानांचा सत्कार –
सी-60 जवानांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज कवंडे आऊटपोस्टला मी भेट दिली आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. आपल्या पोलिस दलाने अवघ्या 24 तासात कवंडे आऊटपोस्टचे निर्माण केले. हे केवळ पोलिस ठाणे नाही, तर शासन-प्रशासन जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम आहे. जेथे सुरक्षेची कमतरता होती, तेथे पोलिस ठाणे उघडत शासन-प्रशासन जनतेपर्यंत पोहोचविले जात आहे.


आता नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर –
गेल्या दोन वर्षांत अशा 6 आऊटपोस्ट तयार केल्या. गेल्या दीड वर्षांत 28 माओवाद्यांना मारले, 31 माओवाद्यांना अटक झाली, तर 44 लोकांनी आत्मसमर्पण केले. हे एक विक्रमी यश आहे. ज्यांच्यावर खूप मोठ्या रकमेची बक्षीसं होती, असेही अनेक आता माओवाद सोडून सामान्य जीवनात परत येत आहेत. आपली ही लढाई आता अंतिम टप्प्यात आहे.

कवंडे येथे तर अतिशय कठीण ऑपरेशन्स आपल्या जवानांनी केले. ज्या बेटावर नक्षलवादी लपून बसले होते, ते ठिकाणही मी आज पाहिले. डोक्यापर्यंत पाण्यात बुडेल, अशा ठिकाणी कसब दाखवून तुम्ही 4 नक्षल्यांना यमसदनी धाडले, हे कौतुकास्पद आहे. मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचा खात्मा करायचा, हे आपले उद्दिष्ट आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अतिशय कठोर पावले उचलली आणि आता नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर आहे.

12 कुख्यात नक्षल्यांची शस्त्रांसह शरणागती –
12 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे बक्षीस होते. त्यांनी अत्याधुनिक शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे. त्यांना भारताच्या संविधानाची प्रत आपण भेट दिली. लॉईडसारख्या उद्योगांनी पुनर्वसनात मोठा हातभार लावला आहे. हा जिल्हा रोजगारयुक्त आणि भारताचे पोलाद शहर म्हणून तो विकास करायचा आहे. हे करताना येथील निसर्गसंपदा, जल, जमीन, जंगल कायम ठेवूनच हा विकास करण्याचा शासनाचा निर्धार आहे.

हेही वाचा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे दर्शन; मुक्ताईनगर येथे केले पालखीचे सारथ्य

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisgadchiroli newskawande villagemaharashtra-chhattisgarh bordersuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 22, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

September 21, 2026
जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

September 21, 2026
जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

September 21, 2026
‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

September 21, 2026
भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

September 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page