• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या हिमांशीला नवी उमेद; सामाजिक जाणीवेतून शालेय साहित्याचे वाटप

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 25, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या हिमांशीला नवी उमेद; सामाजिक जाणीवेतून शालेय साहित्याचे वाटप

ईसा तडवी, प्रतिनिधी

(लोहारा) पाचोरा, 25 जून : बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरपलेली पाचोरा तालुक्यातील लोहारा गावातील हिमांशी महेश खैरनार ही विद्यार्थीनी अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करत आहे. दरम्यान, तिच्या शिक्षणाची ज्योत विझू नये, यासाठी कुमावत बेलदार समाज सेवा संघाचे पाचोरा तालुका अध्यक्ष अण्णा बेलदार यांच्या संकल्पनेतून पाचोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलले नायब तहसीलदार सुभाष कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हिमांशी सध्या लोहारा येथील कन्या शाळेत चौथीच्या इयत्तेत शिक्षण घेत आहे.

शालेय साहित्याचे वाटप –

शालेय साहित्य मिळवून देण्यासाठी माझ्या नातीला मदत करा असे हिमांशी हिची आजी गं.भा. रत्‍नाबाई दिलीप सूर्यवंशी यांनी अण्णा बेलदार यांना सांगितले. यानंतर नायब तहसिलदार सुभाष कुंभार यांना अण्णा बेलदार यांनी माहिती दिली. यानंतर अण्णा बेलदार यांच्या संकल्पनेतून सुभाष कुंभार यांच्या मुख्य उपस्थितीत हिमांशीला दप्तर, स्टील वॉटर बॅग, स्टीलचा डबा (टिफिन), कंपास पेटी, पॅड, वह्या तसेच इयत्ता चौथी डिक्शनरी (इंदू) गणित + सायन्स + इंग्रजी हे सर्व शालेय साहित्य मुलींची कन्या शाळा लोहारा येथे वाटप करण्यात आले.


यावेळी नायब तहसीलदार सुभाष कुंभार तसेच अण्णा बेलदार यांनी हिंमाशीसोबत संवाद साधत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शैक्षणिक बाबतीत कोणत्याही मदतीची गरज असल्यास माहिती करून दे, तुला तात्काळ मदत दिली जाईल, असे त्यांनी आश्वासित केले. दरम्यान, लोहारा गावातील व मुंबई येथे नोकरीनिमित्त स्थायिक असलेले भूमिपुत्र यांनी सुद्धा सदर विद्यार्थ्यांनीस पुढील वर्षांपासून आर्थिक मदत करावी. यामुळे पाचवीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत सदर विद्यार्थ्यांनीस मदत होईल, असे आवाहनही अण्णा बेलदार यांनी केलंय.

बालपणीच हिमांशीच्या आई-वडिलांचं निधन –

हिमांशी ही अवघ्या आठ-नऊ महिन्यांची असतानाच तिच्या आईचं निधन झालं. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांत तिच्या वडिलांचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनांनंतर हिमांशीचा सांभाळ तिची आजी रत्नाबाई दिलीप सुर्यवंशी यांनी केला. प्रतिकूल परिस्थितीतही रत्नाबाईंनी हिमांशीला आधार देत शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ती जबाबदारी उचलली.

हेही वाचा : Pachora News : शिक्षकाची शाळेतच आत्महत्या, पाचोरा शहरातील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newspachora taluka latest newsschool supplies distributionsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page