• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य अशी कारकीर्द अन् आज वयाची 55 वर्ष पुर्ण; वडगाव कडे येथे मधूकर काटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 7, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य अशी कारकीर्द अन् आज वयाची 55 वर्ष पुर्ण; वडगाव कडे येथे मधूकर काटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 7 जुलै : सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात करत पंचायत समिती सदस्य-सभापती तसेच जिल्हा परिषद सदस्यपदापर्यंत मजल गाठली. आणि यामाध्यमातून परिसरात विकासाचा संकल्प पुर्ण करणारे पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे येथील मधूकर काटे यांनी आज वयाची 55 वर्ष पुर्ण केली. यानिमित्त आज 7 जुलै रोजी त्यांचा नागरी सत्कार व अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, त्यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव कडे येथे शिवस्मारक, सभागृह, कचरा गाडी, सी.सी.टी. व्ही. आदी विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी खासदार स्मिता वाघ, माजी आमदार दिलीप वाघ, शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांच्यासह देवीदास आप्पा, भागवत महालपुरे, डॉ.भरत पाटील, शिवदास तात्या, पंचायत समिती सभापती पाचोरा अनिता पवार, भाजपा आध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष संदीप पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन पाटील, राहुल पाटील, प्रकाश पाटील, डॉ शांतिलाल तेली, नंदु सोमवंशी, बन्सी पाटील, माजी सरपंच अतुल पाटील, सुभाष पाटील, अमोल नाना, प्रदीप पाटील तसेच पिंपळगाव हरेश्र्वर गटातील सर्व सरपंच व उपसरपंच व सदस्य व शिवसेना शिंदे व भाजप कार्यकर्ते व मित्र मंडळ तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच पदापासून राजकीय कारकीर्दीला सुरूवात –

मधूकर काटे यांनी वडगाव कडे या गावाच्या सरपंच पदाची धुरा हाती घेत राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. यानंतर 2007 साली त्यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीत बाजी मारत सभापती पदापर्यंत मजल मारली. तसेच 2017 साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाचोरा तालुक्यातील शिंदाड गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. यासोबतच त्यांनी भारतीय जनता पक्षात तालुकाप्रमुख, जिल्हा सरचिटणीस तसेच जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडली आणि आतापर्यंत पक्षसंघटनेला बळकटी देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

दरम्यान, आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत लोकांना जोडत पक्ष संघटनेला बळकटी देत तसेच परिसरातील लोकांना केंद्रस्थानी ठेवत परिसराच्या विकासासाठी मधूकर काटे यांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिल्याच्या भावना आज आयोजित केलेल्या अभिष्ठचिंतन सोहळ्यात व्यक्त करण्यात आल्या.

खासदार स्मिता वाघ काय म्हणाल्या? –

मी जिल्हा परिषदेची सभापती असताना मधूकर काटे हे सदस्य होते. मात्र, यावेळी जनतेच्या विकासासाठी सर्वांत भांडणारे व्यक्ती होते ते म्हणजे मधूकर काटे. मात्र, सातत्याने काम करत त्यांनी गटाचा विकास केला एका-एका गटात 30 ते 35 कोटी रूपयांची कामे त्यांच्या माध्यमातून झाली आहेत. मोठं व्हिजन, दुरदृष्टी आणि जनतेसाठी काम करण्याची धमक असेल यासाठी काम कुठून कशापद्धतीने पुर्णत्वास न्यायचं याचं विद्यापीठ म्हणजे मधूकर काटे असल्याच्या भावना स्मिता वाघ यांनी यावेळी व्यक्त केल्या. लोकांना जोडून ठेवण्यात त्यांनी महत्वपुर्ण भूमिका बजावली असल्याचेही स्मिता वाघ यावेळी म्हणाल्या.

दिलीप वाघ काय म्हणाले? –

यावेळी माजी आमदार दिलीप वाघ म्हणाले की, मधूकर काटे यांनी सरपंच पदापासून त्यांनी आपली राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. यानंतर ते 2 वेळा सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती आणि आता जिल्हा परिषद सदस्य अशा त्यांची राजकीय कारकिर्द राहलीय. ते लोकांमध्ये राहिलेत म्हणून ते अशापद्धतीने काम करू शकले. खरंतर, तळगळातील कार्यकर्ता व्यक्ती कसा घडतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मधूकर काटे याचं असल्याचे दिलीप वाघ यांनी सांगितले.

मधूकर काटे काय म्हणाले? –

यावेळी मधूकर काटे म्हणाले की, 2001 मध्ये मी सर्वप्रथम सरपंच झालो आणि एकदा सरपंच म्हणून निवडून आलो तर गावाने बिनविरोध निवडून दिले. तेव्हापासून आजपर्यंत बऱ्यापैकी बिनविरोध निवडणुकीची परंपरा ठेवलीय. यामुळे गावाचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यास मदत झालीय. यानंतर पंचायत समितीला तसेच जिल्हा परिषदेला निवडून आलो आणि जिल्हा परिषद गट स्वयंपुर्ण केला. दरम्यान, आतापर्यंत वेळोवेळी लोकांचे प्रेम प्राप्त झाल्याने सर्वांचे धन्यवाद मानत असल्याचे काटे म्हणाले.

Video | “कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार; मंत्रीमहोदय वाचवण्याचा प्रयत्न करताय!” विधानरिषदेत एकनाथ खडसे आक्रमक; मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचाराचा केला आरोप

बातमी शेअर करा !
Share
Tags: dilip waghmadhukar katemarathi newsmp smita waghpachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page