• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ 28 टक्के; किमान 50 टक्क्यांपर्यंत पोहचण्यासाठी सरकार प्रयत्नशील – प्रा. मनिष जोशी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कुलगुरू प्रा. व्ही. एल माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली पुस्तक प्रकाशन व लेखक सन्मान सोहळा संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 13, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ 28 टक्के; किमान 50 टक्क्यांपर्यंत पोहचण्यासाठी सरकार प्रयत्नशील – प्रा. मनिष जोशी

जळगाव, 12 जुलै : देशात उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ 28 टक्के आहे ते किमान 50 टक्क्यांपर्यंत पोहचण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनिष जोशी यांनी सांगितले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शनिवार दि. 12 जुलै रोजी कुलगुरू प्रा. व्ही. एल माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली पुस्तक प्रकाशन व लेखक सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रा.मनीष जोशी बोलत होते.

तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे केली असून खुल्या वैकल्पिक पाठ्यक्रमाच्या तयार केलेल्या पुस्तकाबाबत प्रा. जोशी यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी स्वयंमचे कोर्सेस करावेत, असेही ते म्हणाले. तसेच विद्यापीठाने (AEDP) अप्रेंटिसशिप एम्बेडेड प्रोग्राम अंतर्गत केलेल्या नवीन अभ्यासक्रमाबाबत त्यांनी विद्यापीठाचे कौतुक केले. नव्या शैक्षणिक धोरणात सहज उपलब्धता, समान संधी, जबाबदारी, गुणवत्तापूर्ण शिक्षण, माफक दरात शिक्षणाची व्यवस्था ही पाच उद्दिष्टे असल्याने देशातील विद्यापीठांनी या अनुषंगाने कार्य करणे गरजेचे आहे, असेही प्रा. मनिष जोशी म्हणाले. यावेळी मंचावर आग्रा येथील केंद्रीय हिंदी संस्थानचे निदेशक प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी, प्र. कुलगुरू एस टी इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते.

प्रा. सुनील कुलकर्णी बोलताना म्हणाले की, भारतीय भाषा पुस्तक परियोजना केंद्र सरकारकडून राबवली जात असून 3 लाख 96 भारतीय भाषेची पुस्तक तयार करण्यासाठी काम सुरू आहे. यात आपले विद्यापीठ (कबचौउमवि) हे एक पाऊल पुढे आहे असे सांगून मातृभाषेतून शिक्षण दिल्यास ते विद्यार्थ्यांना लगेच समजू शकते तसेच भाषा ही ज्ञान संपादनाची मर्यादा असू शकत नाही. यापुढचे शिक्षण अध्यापक केंद्रित न राहता विद्यार्थी केंद्रित असणार आहे. त्याकरिता अध्यापकांनी सज्ज असायला हवे.


अध्यक्षीय  समारोप करताना कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले की, भाषेची मर्यादा कुठेही राहू नये म्हणून हे नवीन धोरण लागू करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यापीठातील प्राध्यापकांनी  जे काम केले ते कौतुकास्पद आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे बहुआयामी धोरण आहे, त्यातला महत्वाचा आयाम म्हणजे त्या भागाचे शिक्षण त्या मातृभाषेत देणें. आणि त्यासाठी आपण अनेक प्रयत्न केले आहे. आज प्रकाशित झालेली पुस्तके ती निश्चितच विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील. या वर्षापासून 10 हजार विद्यार्थ्यांपर्यंत ही तयार केलेली पुस्तके पोहचणार आहे.

प्रारंभी प्र. कुलगुरू प्रा. एस टी इंगळे यांनी प्रास्ताविक केले. आजच्या कार्यक्रमात विद्यापीठाने खुल्या वैकल्पिक विषयांच्या भारतीय सामाजिक समस्या, अन्न रसायनशास्त्र, सार्वजनिक आरोग्य स्वच्छता, सहकारी कायदा आणि सूक्ष्म वित्त पुरवठा भाग एक आणि भाग दोन, अन्न तंत्रज्ञान, आनंदाचे मानसशास्त्र सत्र 1 आणि कल्याणाचे मानस शास्त्र सत्र 2, गांडूळ खत निर्मिती तंत्रज्ञान, व्यवसाय सांख्यिकी, कृषी भूगोल, वनस्पती आणि रोपवाटिका व्यवस्थापन, दैनंदिन जीवनातील केमिस्ट्री, लोकसंख्या भूगोल, लेखाशास्त्राची मूलभूत तत्वे आणि आधुनिक कार्यालय व्यवस्थापन या 14 पुस्तकांचे व त्यांच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ही पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांचा देखील सन्मान करण्यात आला.

आजच्या कार्यक्रमात पीजी डिप्लोमा इन पेटंट व्हॅल्युएशन अँड मॅनेजमेंट च्या प्रारंभाची घोषणा कुलगुरु प्रा.माहेश्वरी यांनी केली. तसेच विद्यापीठाने बौद्धिक संपदा हक्क अंतर्गत विद्यापीठाचे मंजूर झालेले पेटंटच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुस्तकांचे लेखक प्रा. शैलेश कुमार वाघ आणि प्रा. प्रभाकर महाले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कक्षाधिकारी प्रवीण चंदनकर तर आभार कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी मानले. या कार्यक्रमात विद्यापीठाच्या अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रा. एस. एस राजपूत, प्रा. जगदीश पाटील, व्य. प सदस्य प्रा. पवित्रा पाटील, बौद्धिक संपदा कक्षाचे समन्वयक प्रा. डी जी हुंडीवाले, प्रा. विकास गीते, अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, प्रशाळांचे संचालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा : Big Breaking : जळगावचे सुपूत्र उज्ज्वल निकम होणार राज्यसभा खासदार, राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newskbc north maharashtra university jalgaonsuvarna kkhandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे यांची निवड

कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे यांची निवड

February 22, 2026
भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाचा निषेध! काँग्रेसने माफी मागावी; युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची मागणी

भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाचा निषेध! काँग्रेसने माफी मागावी; युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची मागणी

February 22, 2026
भुसावळमधील अंतर्नाद प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीनिमित्त महावकृत्व स्पर्धेचे आयोजन; 379 स्पर्धकांनी नोंदविला सहभाग

भुसावळमधील अंतर्नाद प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीनिमित्त महावकृत्व स्पर्धेचे आयोजन; 379 स्पर्धकांनी नोंदविला सहभाग

February 22, 2026
गोवा सरकारकडून सहाय्यक राज्य कर अधिकारी व राज्य कर निरीक्षकांची राज्य सेवेत नियुक्ती

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून नोकरीच्या ऑफर लेटर्सचे वितरण

February 22, 2026
गोवा सरकारकडून सहाय्यक राज्य कर अधिकारी व राज्य कर निरीक्षकांची राज्य सेवेत नियुक्ती

गोवा सरकारकडून सहाय्यक राज्य कर अधिकारी व राज्य कर निरीक्षकांची राज्य सेवेत नियुक्ती

February 22, 2026
मोठी बातमी! सरपंच पाहणार प्रशासक म्हणून कारभार; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी! सरपंच पाहणार प्रशासक म्हणून कारभार; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page