• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात ‘बहिणाबाई मार्ट’चे उद्घाटन, नागरिकांना वर्षभर खरेदी करता येणार उत्पादने, ‘खाऊ गल्ली’साठी स्वतंत्र गाळ्यांची योजना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 22, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Guardian Minister Gulabrao Patil inaugurates 'Bahinabai Mart' in Jalgaon, plans for separate lanes for 'Khau Galli'

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगावात 'बहिणाबाई मार्ट'चे उद्घाटन, ‘खाऊ गल्ली’साठी स्वतंत्र गाळ्यांची योजना

जळगाव 22 जुलै : जळगाव शहरातील राजकमल टॉकीजजवळ जिल्हा परिषद बचत भवन इमारतीत ‘बहिणाबाई मार्ट’ या विशेष प्रकल्पाचे आज जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे आज उद्घाटन करण्यात आले.

या प्रकल्पाअंतर्गत जळगावातील नागरिकांना आता वर्षभर महिला बचत गटांनी बनवलेली उत्पादने खरेदी करता येणार आहेत. त्याचबरोबर पारंपरिक चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचीही संधी मिळणार आहे. “महिला बचत गटांच्या आर्थिक स्वावलंबनाचे हे नवे पर्व आहे. बहिणाबाई मार्ट आणि खाऊ गल्लीच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना बारमाही उत्पन्नाचा स्रोत मिळेल आणि त्यांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळेल,” असे उद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी काढले. लवकरच या मार्टमध्ये ‘खाऊ गल्ली’ कार्यान्वित होणार असल्याची माहितीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सूर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे तसेच माजी महापौर विष्णू भंगाळे उपस्थित होते.

जिल्ह्यात सध्या 31 हजार महिला बचत गट कार्यरत असून, त्यांचे ६७ प्रभाग संघ आहेत. सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून आजवर गटांच्या उत्पादनांची विक्री होत होती. मात्र, त्याला बारमाही आणि स्थायी बाजारपेठ मिळावी या हेतूने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून ‘बहिणाबाई मार्केट’ उपक्रमाचा प्रारंभ झाला. या व्यतिरिक्त जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, जिल्हाभरात 10 ठिकाणी बहिणाबाई मार्केटसाठी भूमिपूजन पार पडले आहे. यासाठी अनेक ठिकाणी कामास सुरुवातही झाली असून, काही ठिकाणी लवकरच हे मार्केट सुरू होणार आहे.

जळगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या कोंबडी मार्केट इमारतीतील 20 गाळ्यांमध्ये हे बहिणाबाई मार्ट कार्यरत करण्यात आले आहे. हे गाळे प्रभाग संघ निहाय अदलाबदल करून वापरण्याची सुविधा असून, नाममात्र भाडे आकारले जाणार आहे.

लवकरच ‘खाऊ गल्ली’, खवय्याच्या सेवेत –

सरस प्रदर्शनांमध्ये खाण्याच्या स्टॉलवर सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते. सुगरणींच्या हातच्या पारंपरिक चविष्ट पदार्थांना मागणी असते. हे लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी इमारतीतील अंतर्गत गाळ्यांमध्ये खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या बचत गटांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने येत्या 15 दिवसांत खवय्यांसाठी खास ‘खाऊ गल्ली’ सुरु होणार आहे. हे बहिणाबाई मार्ट महिला बचत गटांच्या आर्थिक स्वावलंबनाचे नवे मापदंड निर्माण करेल, असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

बातमी शेअर करा !
Share
Tags: bahinabai martbahinabai mart jalgaongulabrao patiljalgaonjalgaon newsminal karanwal

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Guardian Minister Gulabrao Patil inaugurates 'Bahinabai Mart' in Jalgaon, plans for separate lanes for 'Khau Galli'

जळगावात ‘बहिणाबाई मार्ट’चे उद्घाटन, नागरिकांना वर्षभर खरेदी करता येणार उत्पादने, ‘खाऊ गल्ली’साठी स्वतंत्र गाळ्यांची योजना

July 22, 2025
Major update in Santosh Deshmukh murder case, court rejects Valmik Karad's application

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, वाल्मिक कराडचा अर्ज न्यायालयाने फेटाळला, उज्ज्वल निकम यांची महत्त्वाची माहिती

July 22, 2025
I will resign if found guilty, Agriculture Minister Kokate clarified his position in a press conference

दोषी असल्यास राजीनामा देईन, ऑनलाईन रमीप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली भूमिका

July 22, 2025
Prime Minister Narendra Modi praised Deputy Chief Minister Ajitdada, what exactly did he say?

Narendra Modi Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उपमुख्यमंत्री अजितदादांचं कौतुक, नेमकं काय म्हणाले?

July 22, 2025
Big news!, Vice President Jagdeep Dhankhar resigned from his post, what did he say in the letter?

मोठी बातमी!, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा, पत्रात काय म्हटलं?

July 22, 2025
Video | “मी वरिष्ठ सभागृहात बसलो होतो त्यावेळी…” जंगली रमीच्या व्हायरल व्हिडिओवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया

Video | “मी वरिष्ठ सभागृहात बसलो होतो त्यावेळी…” जंगली रमीच्या व्हायरल व्हिडिओवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया

July 20, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page