चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 24 जुलै : डी.एड., बी.एड. उत्तीर्ण झालेले गोरगरीब तसेच गरजू तरुणांना शिक्षक म्हणून संधी मिळावी, यासाठी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पावसाळी अधिवेधनात विधानसभेत पवित्र पोर्टलमधील 1:10 प्रमाणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच 100 टक्के निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.
पाचोरा येथील शिवसेना कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते आज दुपारी बोलत होते. दरम्यान, पवित्र पोर्टलचा मुद्दा उपस्थित केल्याने राज्यातील अनेक तरुणांनी माझे आभार मानल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.
पावसाळी अधिवेशनानंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांची पत्रकार परिषद –
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जून ते 18 जुलै दरम्यान पार पडले. या अधिवेशनात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह 9 आमदारांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. यामध्ये आमदार पाटील यांनी पहिल्यांदाच तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहिले. यासोबतच आमदार पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात मतदारसंघाच्या प्रश्नांसह राज्यव्यापी मुद्दे उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, पावसाळी अधिवेशनातील कामगिरीबाबत माहिती देण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांची आज पाचोरा शहरातील शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी जि.प. सदस्य संजय पाटील (भूरा आप्पा), कृषी बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, शिवशक्ती-भीमशक्तीचे जिल्हाप्रमुख प्रविण ब्राम्हणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
किशोर आप्पांनी उपस्थित केला पवित्र पोर्टलचा मुद्दा –
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले की, डी.एड तसेच बी.एड.चे शिक्षण घेतलेले तरूण जे संस्थाचालकांना पैसे भरू शकत नाही. असे अनेक तरूण संपुर्ण महाराष्ट्रात आहेत. अशा तरूणांना न्याय देण्यासाठी, 2012 नंतर डी.एड तसेच बी.एड.चे शिक्षण घेतलेले तरूणांना राज्य सरकारने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील सर्व बेरोजगार तरूणांना न्याय मिळेल, अशा भावनेने या पोर्टलची सुरूवात झाली. अनेक गोरगरीब तरूण जे विद्वान होते ते पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उत्तीर्ण झाले.
परंतु, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उत्तीर्ण झालेला शिक्षक असेल आणि त्याला एखाद्या संस्थेत शिक्षक म्हणून रूजू करायचे असेल तर 1:10 असे प्रमाण राज्य सरकारचे होते. खरंतर, पवित्र पोर्टलद्वारे उत्तीर्ण तरूण हा विद्वान होता म्हणूनच तर तो पास झाला. मात्र, त्याला रूजू करता 1:10 असे प्रमाण का, असा प्रश्न उपस्थित होत होता आणि यातूनच मग जो विद्यार्थी जास्त पैसे देईल आणि रिक्त असलेल्या जागेसाठी लिलाव होण्याची भीती त्यामागे होती.
म्हणून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्यासमोर पवित्र पोर्टलमधील 1:10 प्रमाणाचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, मंत्री दादा भूसे यांनी संपुर्ण मुद्दा समजून घेत समर्पक असे उत्तर दिले. यासोबतच येत्या काळात 100 टक्के या विषयावर निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री दादाजी भूसे यांनी दिले असल्याची माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.
दरम्यान, हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्याने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उत्तीर्ण झालेले महाराष्ट्रातील अनेक गरजू गोरगरीब तरूणांनी फोन कॉल करून प्रचंड मोठ्या प्रमाणात माझे आभार मानले. तर दुसरीकडे अनेक संस्थाचालक माझ्यापासून दुखावले. मात्र, त्या परिणामाची मला पर्वा नसून जे गोरगरीब तरूण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना 100 टक्के न्याय मिळण्यासाठी मी प्रयत्न केला आणि तो पुर्णत्वास जात असल्याने याचा मला सार्थ अभिमान असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिल्यानंतर प्रतिक्रिया –
पहिल्यांदाच तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिल्यानंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, मी गेल्या अकरा वर्षांपासून पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाच नेतृत्व करतोय. या विधानसभेत मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी सहभागी होत मतदारसंघाचे प्रश्न मांडत होतो. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या महायुतीच्या सरकारमध्ये मला तालिका अध्यक्ष होण्याचा बहुमान मला मिळाला.
तालिका अध्यक्ष म्हणून त्या आसनावर बसल्यानंतर निश्चितपणे वेगळ्यापद्धतीचा आनंद आणि अभिमान वाटत होता. मी केवळ 288 आमदारांसमोर मी काम करत नाही तर महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेसमोर बसून मी काम करत असल्याचा अभिमान मला या आसनावर बसलो असताना वाटत होता, अशा भावना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, यानंतर या विधानसभेचा सदस्य म्हणून पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या तसेच राज्यव्यापी प्रश्न उपस्थित केले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
‘आमदार किशोर आप्पा पाटील यांनी अधिवेशन गाजवलं!’
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. दरम्यान, या अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघातील प्रश्नांसह जिल्हा बँकेतील कर्ज वाटप तसेच शिक्षक भरती घोटाळा, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती करण्याबाबत, पाणी पुरवठ्याच्या टाकीबाबत, रेशनधारकांच्या समस्यांबाबत, आदी मुद्दे उपस्थित करत अधिवेशन गाजवलं.
पावसाळी अधिवेशनातील आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या कामकाजासंदर्भात बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
- पावसाळी अधिवेशन 2025 | VIDEO : शेतकऱ्यांच्या शेत-पाणंद रस्त्यांचा राज्यव्यापी मुद्दा; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी अधिवेशनात वस्तुस्थिती मांडत सरकारकडे केली महत्वाची मागणी
- पावसाळी अधिवेशन 2025 | पाण्याच्या टाकीचा मुद्दा, महापुरुषांचे पुतळे, शेतकरी ते व्यापारी बांधवांचे प्रश्न; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या
- जळगाव जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांच्या पीक कर्जवाटपाबाबत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केली महत्वाची मागणी
- पावसाळी अधिवशेन 2025 : आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज पहिल्यांदाच तालिका अध्यक्ष म्हणून पाहिले कामकाज
- Video | पाचोरा तालुक्यातील ‘या’ दोन गावांना मिळणार नगरपंचायतीचा दर्जा?, आमदार किशोर आप्पांनी विधानसभेत नेमकी काय मागणी केली?
- VIDEO : बोगस शालार्थ आयडी प्रकरण; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उचलला 2020 मधील ‘तो’ मुद्दा, एसआयटी चौकशीची केली मागणी, नेमकं प्रकरण काय?
- “वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान” आमदार किशोर आप्पांची विधानसभेत महत्वाची मागणी
- राज्यभरातील होमिओपॅथी डॉक्टरांचा संप; ‘त्या’ धोरणाबाबत प्रश्न उपस्थित करत आमदार किशोर आप्पा पाटील यांची सरकारला विचारणा, नेमकं काय म्हणाले?