• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

17 महिन्यांचा वळूही बाधित, जळगाव जिल्ह्यात लंपी रोगामुळे 12 जनावरांचा मृत्यू, जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 27, 2025
in जळगाव जिल्हा, खान्देश, ताज्या बातम्या
17-month-old bull also affected, 12 animals die due to lumpy disease in Jalgaon district, important orders from the District Collector

17 महिन्यांचा वळूही बाधित, जळगाव जिल्ह्यात लंपी रोगामुळे 12 जनावरांचा मृत्यू, जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश

जळगाव, 27 जुलै : जळगाव जिल्ह्यात लंपी स्किन डिसीज (LSD) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून आहे. दरम्यान, कालपर्यंत जिल्ह्यात लंपी स्किन डिसीजमुळे तब्बल 12 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी याबाबतची माहिती दिली.

दरम्यान, जिल्ह्यातील लंपीच्या या परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एरंडोल तालुक्यातील टोळी खुर्द शिवारात काल प्रत्यक्ष भेट देऊन लंपी बाधित जनावराची पाहणी केली. या शिवारातील एका शेतकऱ्याच्या १७ महिन्यांच्या वळूला लंपीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी त्या गोठ्याला भेट देत पशुपालकास जनावराचे विलगीकरण, योग्य पौष्टिक आहार, स्वच्छता व गोठा व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या दौऱ्यात जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. प्रदीप झोड उपस्थित होते.

जिल्ह्यातील लंपी प्रादुर्भावाची स्थिती –

पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उप आयुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कालपर्यंत जिल्ह्यात लंपी स्किन डिसीजचे एकूण ५७ एपिसेंटर आढळून आले असून, एकूण २६५ जनावरे बाधित आहेत. त्यामध्ये ६३ जनावरे उपचारानंतर पूर्णपणे बरे झाली आहेत, तर १२ जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सद्यस्थितीत १९० जनावरे उपचाराधीन असून त्यांच्या योग्य काळजीसाठी प्रशासन सज्ज आहे.

सतर्कतेचे निर्देश व प्रतिबंधात्मक उपाय –

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकरी व पशुपालकांनी जनावरांमध्ये लंपीची लक्षणे आढळताच तात्काळ शासकीय पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही खाजगी वैद्यकीय पदविकाधारकांनी परस्पर उपचार करू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील बाधित तालुक्यांमध्ये सार्वजनिक चराई, जनावरांची वाहतूक व पाणीहौद वापरावर निर्बंध लागू करण्यात आले असून, कीटक निर्मूलनासाठी ग्रामपंचायतींमार्फत फवारणीसह स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी यांनी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे समन्वय साधून जनावरांचे प्राण वाचवण्यासाठी तात्काळ आणि काटेकोरपणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ayush prasadjalgaonjalgaon newsLumpylumpy skin disease

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 11, 2026
Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

May 11, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

May 11, 2026
‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

May 11, 2026
अवघ्या दोन वर्षांपूर्वी पक्ष स्थापन केला, अख्खं तमिळनाडू पिंजून काढत जनतेत उतरला अन् आज ‘थलपती’ विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान!

अवघ्या दोन वर्षांपूर्वी पक्ष स्थापन केला, अख्खं तमिळनाडू पिंजून काढत जनतेत उतरला अन् आज ‘थलपती’ विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान!

May 10, 2026
जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! 5 लाख रुपयांची लाच घेताना PWD चा शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! 5 लाख रुपयांची लाच घेताना PWD चा शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 10, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page