ईसा तडवी, प्रतिनिधी
वाडी-शेवाळे (पाचोरा), 13 जुलै : पाचोरा तालुक्यातील वाडी-शेवाळे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी प्रभाबाई भिकन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध निवड झाल्यानंतर सर्व लोकांना सोबत घेऊन काम करू आणि राहिलेली कामे पूर्ण करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
गेल्या वर्षी वाडी-शेवाळे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक झाली. त्यावेळी परिवर्तन पॅनेलचे 9 निवडून आले होते. तसेच आणखी एका पॅनेलचे 3 जण निवडून आले होते. या निवडणुकीनंतर गेल्या वर्षी एका वर्षासाठी रमेश पोपट पाटील यांची चेअरमन म्हणून निवड झाली होती. त्यांचा एका वर्षाचा कालावधी संपल्यानंतर आता प्रभाबाई भिकन पाटील यांची बिनविरोधन निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी आर. डी. राऊत उपस्थित होते.
तसेच यावेळेस माजी चेअरमन रमेश पाटील, व्हॉईस चेअरमन संतोष मोरे, ज्येष्ठ संचालक प्रकाश पाटील, शेवाळे सरपंच योगेश काकडे, डॉ. एल. टी. पाटील, वाडीचे सरपंच नंदू पाटील, वि.का.सो .संचालक भगवान पांडे, दत्तू काकडे, दिनकर पाटील , ईश्वर पाटील, संजय पाटील, बाळू देवरे माजी सरपंच डॉ. शेखर पाटील, डी. एन काकडे, सेक्रेटरी संजय बारी, सेल्समन आंनदा पाटील, क्लार्क सुरेश पाटील, शिपाई गणेश पाटील आदी. उपस्थित होते.






