ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 2 सप्टेंबर : पाचोरा तालुक्यात, पंचायत समिती अंतर्गत म. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जळगाव यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद आपल्या दारी या जनकेंद्रीत उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या, अडचणी व तक्रारींचे निरासरण व त्यावर तातडीने उपाययोजना करणेसाठी तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उद्या 3 सप्टेंबर बुधवारी रोजी सकाळी 11 वाजता हे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील तात्यासाहेब आर. ओ. पाटील व्यापारी संकुल याठिकाणी या तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या तक्रार निवारण सभेस जिल्हास्तरवरील सर्व विभागप्रमुख देखील उपस्थित राहणार आहेत. तक्रार निवारण सभा सुरू होण्यापूर्वी, ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्राप्त झालेल्या तक्रारींची नोंद करण्यात येऊन, त्यांना टोकन दिले जाणार आहे. आणि सदर टोकन क्रमांकानुसार, संबंधित तक्रारदार यांची समस्या ऐकून घेतली जाईल, प्रशासनातर्फे सदर कामकाजासाठी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के. बी. अंजने यांनी दिली.
त्यामुळे जिल्हा परिषद आपल्या दारी, या उपक्रमांतर्गत असलेल्या तक्रार निवारण सभेस ग्रामीण भागातील, नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समिती पाचोरा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.