पणजी, 17 सप्टेंबर : गोव्याच्या सांस्कृतिक वारशाला मोठा सन्मान देत पणजीतील आयनॉक्स येथे ‘दशावतार’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आज उत्साहात पार पडले. या चित्रपटाद्वारे कोकणातील पारंपारिक दशावतार कला मोठ्या पडद्यावर येत असून ती तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य केले गेले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “गोमंतकीयांच्या आणि सरकारच्या वतीने मी या चित्रपटाला शुभेच्छा देतो. आपल्या गावातील प्रत्येक कार्यक्रमाला दशावताराचा प्रयोग होतो आणि लोक तिकीट काढून त्याचा आनंद घेतात. कोकणातील दशावतार कला मोठ्या पडद्यावर आणण्याचे हे मोठे काम आहे. यंग जनरेशनपर्यंत दशावतार पोहोचवण्याचे उत्कृष्ट कार्य या चित्रपटाने केले आहे.”
या सोहळ्याला दामू नाईक, सुभाष फळदेसाई, संकल्प आमोणकर, दाजी साळकर यांच्यासह स्टारकास्टमधील दिलीप प्रभावळकर, प्रियदर्शनी इंदलकर, सुनिल तावडे, आरती वडगबालकर, रवींद्र काळे, सुजय हांडे, सुगंधा लोणीकर, सिद्धार्थ मेनन, संवाद-गीतकार गुरु ठाकूर, संजय दुबे, नितिन सहस्त्रबुद्धे, आदित्य जोशी, लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर, निर्माते ओंकार काटे तसेच दशावतार कलावंत उदय राणे व दादा राणे यांची उपस्थिती लाभली.