• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘ओला दुष्काळ जाहीर करा!’, मुख्यमंत्र्यांकडे जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची मागणी; CM देवेंद्र फडणवीसांनी पूरस्थितीचा घेतला आढावा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 27, 2025
in जळगाव जिल्हा, खान्देश, ताज्या बातम्या
‘ओला दुष्काळ जाहीर करा!’, मुख्यमंत्र्यांकडे जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची मागणी; CM देवेंद्र फडणवीसांनी पूरस्थितीचा घेतला आढावा

जळगाव, 27 सप्टेंबर : महाराष्ट्रातील बहुतांश भागात अतिवृष्टी झाली असून जळगाव जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे येथे लोकनेते दाजीसाहेब रोहिदासजी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन व जनसेवा पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांचे जळगावातील विमानतळावर आगमन झाले. यानंतर ते धुळ्याकडे रवाना झाले.

दरम्यान, जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आगमन होताच जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. तसेच जळगाव जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी केली. पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी याबाबतचे निवदेन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले.

याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, किशोर पाटील, अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सीईओ मिनल करनवाल तसेच राजकीय पक्षातील स्थानिक पदाधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीचा घेतला आढावा –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जळगावचे जिल्हाधिकारी यांच्याकडून पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच आयुष प्रसाद यांनी पावसाची स्थिती, पूर परिस्थिती व पंचनामा कामकाजाबाबत मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पाचोरा, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, एरंडोल या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर मदत  दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानी संदर्भात फार काही निकषात कोणाला न अडविता सर्वांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.  नुकसान भरपाईसाठी फक्त नुकसानाची नोंद असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आपले नुकसानीचे फोटो स्वतः काढले असतील ते देखील आम्ही मान्य करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.

नुकसानी संदर्भात राज्यातील ज्या भागांचे पंचनामे अहवाल शासनाकडे प्राप्त झाले आहेत त्यांच्यासाठी शासनाने या अगोदर 2 हजार 300 कोटी रुपये दिले असून इतर भागांचे पंचनामे शासनास प्राप्त झाल्यावर आवश्यक मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, अतिवृष्टीच्या आपत्ती काळात स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने धीर देऊन मदत केल्याबद्दल  यावेळी अतिवृष्टीग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा : Video | महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान अन् मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; भेटीनंतर दिली महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisfloodjalgaon district latest newsjalgaon floodjalgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page