• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

Video | महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान अन् मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; भेटीनंतर दिली महत्वाची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 26, 2025
in ताज्या बातम्या, देश-विदेश, महाराष्ट्र
Video | महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान अन् मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; भेटीनंतर दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली, २६ सप्टेंबर : महाराष्ट्रातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी शासनाकडून मदतीच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट महाराष्ट्रातील नुकसानीची माहिती दिली. दरम्यान, या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी निवेदनही त्यांना सादर केले. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांना दिली.

तसेच महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहिसर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेचे हस्तांतरण तसेच ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’च्या दृष्टीने महाराष्ट्र शासन करीत असलेले उपाय इत्यादींबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी अतिशय सविस्तर चर्चा केली.

गडचिरोली पोलाद सिटी

गडचिरोली येथे पोलाद सिटीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून, हा एक आकांक्षित जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्य मायनिंग कॉर्पोरेशनला एरिया लिमिटमध्ये सवलत मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. गडचिरोलीत पोलाद उत्पादनाची प्रचंड क्षमता असून, हे स्टील, ग्रीन स्टील असणार आहे. चीनपेक्षाही कमी किंमतीत हे स्टील उपलब्ध होणार आहे. गडचिरोलीत १ लाख कोटींहून अधिकची गुंतवणूक यापूर्वीच आलेली आहे. हा जिल्हा नक्षलमुक्त करुन विकासाच्या अमाप संधी यातून निर्माण होणार आहेत.


तीन संरक्षण कॉरिडॉर

संरक्षण आणि अंतरिक्ष क्षेत्रात महाराष्ट्र भक्कम भागिदार म्हणून काम करतो आहे. महाराष्ट्रात १० ऑर्डिनन्स फॅक्टरी आहेत. देशाला लागणाऱ्या एकूण शस्त्र आणि दारुगोळ्यापैकी ३० टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते. त्यामुळे महाराष्ट्र हे संरक्षण कॉरिडॉरसाठी प्रभावी क्षेत्र आहे. महाराष्ट्रात तीन संरक्षण कॉरिडॉरसंदर्भात तपशीलवार सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिले. यातील पहिला कॉरिडॉर पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, दुसरा कॉरिडॉर अमरावती, वर्धा, नागपूर, सावनेर आणि तिसरा कॉरिडॉर नाशिक-धुळे असा असेल. या तिन्ही कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक राज्यात येणार असून, त्यामुळे मोठा रोजगारसुद्धा निर्माण होईल. राज्य शासनाने यासंदर्भात ६० हजार कोटींचे सामंजस्य करार यापूर्वीच केले आहेत. त्यामुळे या कॉरिडॉरला मान्यता देण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडे केली.

दहिसर येथील जागेचे हस्तांतरण

दहिसर पूर्व येथील ५८ एकर जागेची मालकी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे आहे. या जागेचे मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएला हस्तांतरण करण्याचा आधी निर्णय झाला होता. पण, डिझाईनमध्ये झालेल्या बदलांमुळे एमएमआरडीएने माघार घेतली. या जागेची मागणी आता मुंबई महापालिकेने केली आहे. या भागात एचएफ रिसिव्हींग स्टेशन असल्याने या भागाचा संपूर्ण विकास खोळंबला आहे. हे हस्तांतरण झाल्यास या जागेचा सार्वजनिक उपयोगासाठी आणि विकासासाठी करता येईल. यामुळे उंचीचे प्रश्न सुद्धा सुटतील. त्यामुळे ही जागा मुंबई महापालिकेला देण्यात यावी, अशी मागणी या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे येत्या ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी फिनटेक परिषदेसाठी मुंबईत येणार असून, नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो-३ या प्रकल्पांचा शुभारंभ ते करतील.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येईल, तसा प्रस्ताव आम्ही पाठविला आहे, अशी माहितीही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

हेही वाचा : आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागणी; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisfarmers issuesfloodheavy rainmarathi newspm narendra modi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page