ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 6 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या संघटनेच्यावतीने पाचोऱ्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा विभागीय अधिवेशन तसेच पत्रकारांना मोफत लॅपटॉप बॅग विमा व पुरस्कार वितरण सोहळा 4 ऑक्टोबर रोजी दुपारी पार पडला. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव मराठे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई या संघटनेत उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई या संघटनेत ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव मराठे यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून पाचोरा-भडगावचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते विठ्ठलराव मराठे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रातील कारकिर्दीचा सन्मान म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईकडून त्यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विश्वासराव अरोटे, उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, वाशिम जिल्हाध्यक्ष दिलीप सोमाने, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर, भुवनेश दुसाने यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई या संघटनेत विठ्ठलराव मराठे यांनी उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी मिळाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.






