• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आज पार पडलेल्या कार्यक्रमात मतदारसंघातील शेतकऱ्यांना आश्वासन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 24, 2026
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

पाचोरा, 24 सप्टेंबर: पाचोरा-भडगाव मतदारसंघात यंदा पावसाचे प्रमाण कमी असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक भागांमध्ये पिकांची परिस्थिती चिंताजनक असून अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत ४० टक्क्यांपेक्षाही कमी उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी राज्य सरकारकडे अहवाल सादर झाल्यानंतर आपण वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले. पाचारो शहरातील समर्थ लॉन्स येथे शिवसंवाद दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज दुपारी बोलत होते.

‘शेतकऱ्यांसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळालं’ –

मागील वर्षी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई संदर्भात पाठपुरावा करण्याबाबत बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, कापूस उत्पादकांसह विविध पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी गेल्या वर्षभरापासून केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी सुमारे ४५ कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत हा निधी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल, असे त्यांनी सांगितले.

महावितरणच्या कारभारविरोधात आमदारांचे भाष्य –

वीज प्रश्नावरही त्यांनी भाष्य करत महावितरण प्रशासनाच्या कारभाराविरोधात खंत व्यक्त केली. स्मार्ट मीटर, वाढीव वीजबिल, कृषी सौरपंपांना होणारा विलंब आणि सौरऊर्जा निर्मितीच्या वापराबाबत शेतकरी व नागरिकांमध्ये असलेल्या अडचणी सरकारच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पावसाचे पाणी उपलब्ध असताना त्याचे योग्य नियोजन करून रब्बी हंगामासह भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी जलसाठ्याचे संवर्धन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना केले आवाहन –

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना तयारीचे आवाहन केले. तसेच आगमी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये 80 टक्के ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचा विजय होईल, असाही निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य बच्चू कडू यांचे पाचोरा-भडगाव मतदारसंघात स्वागत करत त्यांच्या उपस्थितीबद्दल आभार मानले.

बच्चू कडू यांच्या शिवसंवाद दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाचोरा-भडगाव तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते, प्रहार पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच शेतकरी आणि अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, अरुण पाटील, प्रा.डॉ. अस्मिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण ब्राम्हणे यांनी केले.

प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी –

कार्यक्रम पार पडल्यानंतर माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह आमदार किशोर आप्पा पाटील यांनी गोराडखेडा तसेच कुऱ्हाड परिसरातील शिवारात कापूस व सोयाबीन पिकांची पाहणी केली. सोयाबीनच्या शेतात पाहणी करताना शेंगा बारीक असल्याचे निदर्शनास आले. परिसरातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी पिकांची स्थिती, उत्पादनातील घट तसेच निर्माण झालेल्या अडचणींबाबत व्यथा मांडल्या. शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

हेही वाचा: “सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmer updatesmla kishor appa patilpachora bhadgaon constituencypachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

September 24, 2026
“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

September 24, 2026
चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

September 23, 2026
जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

September 23, 2026
माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

September 23, 2026
पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 45.49 कोटींचा वाढीव निधी; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 45.49 कोटींचा वाढीव निधी; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

September 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page