ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 13 ऑक्टोबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झालंय. पाचोरा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जागांचे आरक्षण आज, 13 ऑक्टोबर दुपारी 12 वाजता स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील व्यापारी भवन, भडगाव रोड, पाचोरा येथे पार पडले. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, 2025 नुसार ही सोडत प्रक्रिया पार पडली. या सोडतीचे अध्यक्षस्थान मा. भुषण अहिरे, उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांनी भूषविले. यावेळी संबंधित अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि इच्छुक नागरिक उपस्थित होते.
पंचायत समितीसाठी पाचोरा तालुक्यात गणनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे…
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी गट व गणांची रचना आधीच निश्चित करण्यात आली आहे. आता आरक्षणाच्या सोडतीनंतर प्रत्येक गट आणि गण यामध्ये सामान्य, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय या प्रवर्गानुसार जागांचे आरक्षण निश्चित झालंय.
इच्छुकांकडून उमेदवारीसाठी होणार प्रयत्न –
राजकीय पक्ष तसेच संभाव्य उमेदवारांनी मागील काही दिवसांपासून आपल्या गटातील आरक्षणाचे गणित मांडण्यास सुरुवात केली होती. मात्र, आज होणाऱ्या सोडतीनंतर प्रत्येक गणाचे आरक्षण ठरल्याने, अनेक इच्छुकांकडून राजकीय समीकरणे आखायला सुरूवात झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, विद्यमान सदस्य तसेच नवीन चेहरे यांना आता निवडणुकीत उमेदवारी जाहीर होण्याकडे लक्ष ठेऊन आहेत.
सोडतीनंतर राजकीय हालचालींना येणार वेग –
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणानुसार आज एकदा आरक्षण निश्चित झाल्याने उमेदवार निवड प्रक्रिया, प्रचार नियोजन आणि संघटनात्मक तयारीला वेग सुरू आला आहे. राजकीय वर्तुळातही या सोडतीला मोठे महत्त्व लाभले आहे. तर दुसरीकडे राज्यातील घटक पक्षांमध्ये असलेल्या युती-आघाडी ही स्वबळावर लढणार की एकत्र लढणार हे देखील लवकरच स्पष्ठ होणार आहे.