• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख आठवा | राजभवनातली दिवाळी : सोहळा आपुलकीचा आणि स्नेहाचा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 21, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख आठवा | राजभवनातली दिवाळी : सोहळा आपुलकीचा आणि स्नेहाचा

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘राजभवनाचे किस्से’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जातो. या मालिकेतील हा आठवा लेख.

राज्याचे वैभव असलेले राजभवन ही संसदीय लोकशाहीतील प्रमुख संस्था आहे. राज्यपाल राज्याचे घटनाप्रमुख असतात. परंतु, राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांकरिता राज्यपाल हे कुटुंबप्रमुख देखील असतात. राजभवनात अनेक वर्षांपासून दिवाळीनिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन केले जाते.

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि इतर अधिकारी मिठाई वाटप करताना
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि इतर अधिकारी मिठाई वाटप करताना

राज्यपालांच्या पत्नी देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात आणि प्रत्येक कर्मचाऱ्याशी संवाद साधतात, त्यांची विचारपूस करतात. यावेळी कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते मिठाई वाटप केले जाते.

यंदा महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार असलेले गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत प्रवासात असल्यामुळे त्यांच्या वतीने राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना मिठाईवाटप करण्यात आले. हा कार्यक्रम केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता राज्यपाल आणि राजभवनातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्यातील स्नेहबंधाचा सोहळा असतो.

राज्यपाल के. शंकरनारायणन कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करतात
राज्यपाल के. शंकरनारायणन कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करतात

राजभवनातील कर्मचाऱ्याला, कामगाराला, पोलीस जवानांना व अधिकाऱ्यांना हा कार्यक्रम म्हणजे राज्यपालांना प्रत्यक्ष भेटण्याची व शुभेच्छा देण्याची एक संधी असते. त्यामुळे सर्व लोक या संधीची वाट पाहत असतात. अर्थात या कार्यक्रमासाठी पूर्वनियोजन केले जाते.

राजभवनातील सर्व विभागांमधील कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम व विद्युत विभागाचे कर्मचारी, माळी खाते, खानपान विभाग, पोलीस दलातील कर्मचारी, कंत्राटी कामगार व श्रमिक – सेवक वर्ग या सर्वांना या कार्यक्रमाला आवर्जून बोलावले जाते. कार्यक्रमाच्या सकाळपासूनच कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. काही कर्मचारी पोशाखात तर काही सणावाराचे कपडे घालून कार्यक्रमाला उपस्थित राहतात.

राज्यपाल सी.एच. विद्यासागर राव आणि श्रीमती विनोदा दिवाळी साजरी करताना
राज्यपाल सी.एच. विद्यासागर राव आणि श्रीमती विनोदा दिवाळी साजरी करताना

पूर्वी मिठाई सोबत फटाके देण्याची देखील पद्धत होती. परंतु, पर्यावरण जागरुकता निर्माण झाल्यामुळे आता मात्र केवळ मिठाई वाटप केले जाते. कार्यक्रमाच्या दिवशी बरेचदा मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात व दिवे लावून परिसर सजवला जातो.

दिवाळी मिठाई वाटप कार्यक्रमात राज्यपाल सी.एच. विद्यासागर राव आणि श्रीमती विनोदा
दिवाळी मिठाई वाटप कार्यक्रमात राज्यपाल सी.एच. विद्यासागर राव आणि श्रीमती विनोदा

राज्यपाल शंकरनारायणन व त्यांच्या पत्नी राधा तसेच राज्यपाल विद्यासागर राव व त्यांच्या पत्नी विनोदा या कार्यक्रमाशिवाय कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना निवासस्थानी बोलावून दिवाळी साजरी करीत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका दिवाळीत रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी रांगोळीचे निरीक्षण करताना
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी रांगोळीचे निरीक्षण करताना

राजभवनातील प्रत्येक कर्मचारी, छोटा असो वा मोठा, या दिवशी आपण एकाच परिवाराचा भाग असल्याचा अनुभव घेतो. हा सोहळा सर्व कर्मचाऱ्यांच्या मनात आपुलकी व स्नेहाचा भाव जागवतो. या दिवशी घेतलेली छायाचित्रे कर्मचाऱ्यांच्या घरी अनेक वर्षानंतर देखील भिंतीवर विराजमान झालेली दिसतात. ती आठवण असते त्या राज्यपालांसोबत सोबत घालवलेल्या अनमोल क्षणांची!

लेखन – श्री. उमेश काशीकर (माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, राजभवन, मुंबई)

हेही वाचा : विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख सातवा| कीर स्टार्मर – मोदी भेटीनिमित्त राजभवनाच्या कथा

बातमी शेअर करा !
Share
Tags: diwali celebrationkisse rajbhawanachemarathi newsraj bhavanumesh kashikar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page