• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चोरी झाल्यानंतर प्रथमच एकनाथ खडसेंनी जळगावात घराची केली पाहणी अन् केला मोठा दावा, म्हणाले, “कागदपत्रे-सीडी आणि पेनड्राईव्ह…!”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 29, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
चोरी झाल्यानंतर प्रथमच एकनाथ खडसेंनी जळगावात घराची केली पाहणी अन् केला मोठा दावा, म्हणाले, “कागदपत्रे-सीडी आणि पेनड्राईव्ह…!”

जळगाव, 29 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील शिवराम नगर येथील निवासस्थानी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. यामध्ये खडसे यांच्या घरातील सोने-चांदीचे दागिने आणि काही रोकड रक्कम चोरीला गेल्याचे सांगितले जात होते. मात्र, एकनाथ खडसे यांनी मुंबईतून जळगावातील निवासस्थानाची पाहणी केली आणि त्यांनी माध्यमांसोबत बोलताना मोठा दावा केलाय.

एकनाथ खडसेंचा मोठा दावा –

एकनाथ खडसे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, मी मुंबईला असताना रात्री उशिरा 12 वाजून 37 मिनिटांनी माझ्या घरात चोरी झाली.  यामध्ये चोरांनी सोने,चांदी यासह महत्वाची कागदपत्रं ,पेन ड्राइव्ह आणि काही महत्वाच्या सीडी ही चोरीस गेलेले आहेत. तसेच माहिती अधिकाराद्वारे मी महत्वाची कागदपत्रे मिळवली होती. यामध्ये काही भ्रष्टाचार प्रकरणांचा देखील समावेश होता. मात्र, ती देखील चोरट्यांनी गायब केल्याचे दिसून येत आहे.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, चोरट्यांकडे मोठ्या तीन बॅगा होता असे सीसीटीव्हीद्वारे दिसून येत आहे. वास्तविकतः सोने-चांदीच्या भेटवस्तू मला माझ्या कार्यकर्त्यांकडून मिळाल्या होत्या आणि ते साहित्य लहानशा बॅगमध्ये देखील बसू शकत होते. परंतु, या तीन बॅगांमध्ये घरातील नेमकं काय नेलं याबाबत मला आश्चर्य वाटतंय.

दोन ते अडीच हजार कागदपत्रे चोरीला –

दरम्यान, कागदपत्रांशिवाय घरातून जास्त काही चोरीला गेल्याचे दिसून येत नाही. बाकीच्या सगळ्या वस्तू जशाच्या तशा आहेत. फक्त घरातून कागदपत्रे तसेच सीडी वैगेरे गायब आहेत. यामध्येही निम्म्या सीडी आणि कागदपत्रे चोरीला गेल्या आहेत. यामध्ये जवळपास चारशे ते साडेचारशे झेरॉक्स कॉपी शिल्लक आहेत आणि बाकीचे दोन ते अडीच हजार कागदपत्रे चोरीला गेलेले आहेत. यामुळे चोरीचा हेतू नेमका काय होता याबद्दल मलाही शंका असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करावा, असेही एकनाथ खडसे म्हणाले.


खडसेंची पोलीस प्रशासनावर टीका –

घरातील चोरी प्रकरणानंतर एकनाथ खडसेंनी जळगाव पोलिसांवर निशाणा साधला. जिल्ह्यात मोठी गुन्हेगारी वाढली असून चोरीचे प्रकार उघडकीस येत आहेत. तसेच हप्तेखोरीत देखील वाढ झाली असून लेखी पुरावे देखील देऊनही पोलीस कारवाई करत नसल्याचे एकनाथ खडसेंनी म्हटलंय.वाळू माफिया मोठ्या प्रमाणात डोक्यावर बसले असून याबाबतचे 26 ते 27 पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देऊन देखील परंतु कुठलेही बंधन त्यावर घातले गेलेले नाहीये.

पोलीस आणि गुन्हेगारांचे एकत्रित संगनमत असल्याचे चित्र दिसून येत आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले.  दरम्यान, वरिष्ठ स्तरावर या प्रकरणाची नोंद घेतली जावी आणि घटनेचा लवकरात लवकर तपास करून याठिकाणी पोलिसांचा वचक राहिल अशा स्वरूपाची कारवाई करावी, अशी अपेक्षाही एकनाथ खडसेंनी व्यक्त केलीय.

हेही वाचा : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’, लाभार्थी महिलांना मंत्री आदिती तटकरे यांचे ई-केवायसीबाबत महत्वाचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath khadsejalgaon newssuvarna khandesh livetheft case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरण; लातूरच्या प्रसिद्ध ‘आरसीसी’ कोचिंगचा संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक

नीट पेपरफुटी प्रकरण; लातूरच्या प्रसिद्ध ‘आरसीसी’ कोचिंगचा संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक

May 18, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘जनजातीय गरिमा उत्सव २०२६’ व ‘जन भागीदारी अभियान’चा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात ‘जनजातीय गरिमा उत्सव २०२६’ व ‘जन भागीदारी अभियान’चा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

May 18, 2026
नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

May 18, 2026
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 

May 18, 2026
भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

May 18, 2026
एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी टोळीचा जळगाव LCB ने केला पर्दाफाश; दोन ट्रॅक्टर जप्त, दोघे ताब्यात

एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी टोळीचा जळगाव LCB ने केला पर्दाफाश; दोन ट्रॅक्टर जप्त, दोघे ताब्यात

May 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page