मुंबई, 4 नोव्हेंबर : गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घोषित होण्याबाबतची प्रतिक्षा केली जात असताना मोठी बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर होणार? –
मुंबईत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच पहिल्या टप्प्यात नगरपालिका तसेच नगपरंचायत निवडणूक जाहीर होण्याचा अंदाज लावला जात आहे.
राजकीय वातावरण तापणार –
राज्यात मागील वर्षी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वत्र उत्सुकता लागली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्यात सर्वत्र राजकीय वातावरण तापणार असल्याचे दिसून येत आहे.






