• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी – आरोग्यमंत्र्यांच्या सूचना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 13, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी – आरोग्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्यासाठी विभागामार्फत रचनात्मक कामांवर भर द्यावा, तसेच नागरीकांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य भवन येथे आरोग्य विभागाच्या विविध सेवांचा आढावा मंत्री आबिटकर यांनी घेतला त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीत लसीकरण, कर्करोग निदान, सिकल सेल नियंत्रण, मानसिक आरोग्य, मधुमेह आणि उच्च रक्तदाब या विषयांवर चर्चा झाली.

बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ. सुनिता कोल्हाहित, सहसंचालक सांगळे, सहाय्यक संचालक दीप्ती पाटील देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य विभागाचा निधी रचनात्मक आणि परिणामकारक कामांवर खर्च व्हावा असे सांगून सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, विशेषतः लसीकरण, कर्करोग निदान व उपचार, तसेच सिकल सेल अनुवांशिक आजार नियंत्रणासाठी ठोस उपक्रम राबवावेत. या सेवांसाठी आवश्यक निधी नियोजनपूर्वक वितरित करावा. राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत देशभरात सुरू असलेल्या नवकल्पनांचा अभ्यास करून, महाराष्ट्रासाठी उपयुक्त योजना समाविष्ट कराव्यात. विभागाने तज्ज्ञांचे मत जाणून घेत नियोजन करावे, तसेच आरोग्यसेवा पुरवताना नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळतील याची काळजी घ्यावी, असे श्री. आबिटकर यांनी सांगितले.


सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, आशा सेविकांचे मानधन वेळेत मिळावे, यासाठी काटेकोर पावले उचलावीत. विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच डीबीटी योजनेंतर्गत निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वेळेत पोहोचावा, यासाठी प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात यावा. गरजेच्या वस्तूंचीच खरेदी सीएसआर माध्यमातून करावी, तसेच गरजू रुग्णांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा, यासाठी तरतूद करावी.आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, तसेच पॉलिएटिव्ह केअर कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, कर्करोग रुग्णांना दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी स्वतंत्र मूल्यमापन समिती नेमावी.

तसेच मानसिक आरोग्य, आयूष सेवांचा विस्तार आणि आरोग्यविषयक जनजागृती या विषयांवर विशेष भर द्यावा. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन नियोजन करावे, राज्यातील सर्व आरोग्य समन्वयकांच्या मासिक बैठका घेऊन कामाचे मूल्यमापन नियमितपणे करावे, विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग करून सेवांचा दर्जा उंचवावा, असे निर्देशही सार्वजनिक मंत्री आबिटकर यांनी दिले.

हेही वाचा : Crime News : अमळनेर पोलिसांची यशस्वी मोहीम; चोरीच्या 24 दुचाकी हस्तगत, दोन संशयित जेरबंद

बातमी शेअर करा !
Share
Tags: citizenshealth servicesmarathi newsminister prakash abitakrsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | ‘राष्ट्रीय महामार्गावरचं गाव आहे पण बसस्थानक नाही!’, चार वर्षांपासून रखडला लासगावातील बसस्थानकाचा प्रश्न

VIDEO | ‘राष्ट्रीय महामार्गावरचं गाव आहे पण बसस्थानक नाही!’, चार वर्षांपासून रखडला लासगावातील बसस्थानकाचा प्रश्न

June 20, 2026
आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अडावद येथे वृक्षारोपण व गोसेवेचा उपक्रम

आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अडावद येथे वृक्षारोपण व गोसेवेचा उपक्रम

June 20, 2026
पिंप्री खु. येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन

पिंप्री खु. येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन

June 20, 2026
अवैध धंद्यांविरोधात महिलांनी निर्भयपणे पुढे यावे : एपीआय कल्याणी वर्मा

अवैध धंद्यांविरोधात महिलांनी निर्भयपणे पुढे यावे : एपीआय कल्याणी वर्मा

June 20, 2026
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार वाढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार वाढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 20, 2026
VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

June 19, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page