• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अमळनेर पोलिसांची यशस्वी मोहीम; चोरीच्या 24 दुचाकी हस्तगत, दोन संशयित जेरबंद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 13, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम, ताज्या बातम्या
अमळनेर पोलिसांची यशस्वी मोहीम; चोरीच्या 24 दुचाकी हस्तगत, दोन संशयित जेरबंद

जळगाव, 13 नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना अमळनेर पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. विविध ठिकाणांहून चोरीला गेलेल्या तब्बल 24 दुचाकींसह दोन संशयितांना नंदुरबार जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून, या दुचाक्यांची एकूण किंमत सुमारे 15 लाखांपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेले संशयित म्हणजे हिंमत रेंहज्या पावरा आणि अंबालाल भुरट्या खरर्डे (दोघे रा. सातपिंप्री, ता. शहादा, जि. नंदुरबार) अशी आहेत. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धडगाव परिसरातील डोंगराळ भागात सापळा रचून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान, अमळनेर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे चोरीच्या दुचाकींचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात असून, एकाच वेळी तब्बल 24 दुचाकी जप्त केल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

24 चोरीच्या दुचाकी पोलिसांनी केल्या हस्तगत –

चौकशीत दोघांनी अमळनेर तसेच इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर त्यांनी सांगतिल्यानुसार, पोलिसांनी सातपिंप्री येथील जंगल परिसरातून तब्बल 24 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या. त्यात होंडा युनिकॉर्न, शाईन, बजाज पल्सर, टीव्हीएस रायडर, हीरो स्प्लेंडर अशा विविध कंपनींच्या दुचाकींचा समावेश आहे.

अमळनेर पोलीस ठाण्यात यापूर्वी नोंदविण्यात आलेल्या गुन्हे क्रमांक 308/2025, 299/2025 आणि 233/2025 मधील चोरीच्या वाहनांचा शोध सुरु होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फूटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.

ताब्यातील दोन्ही संशयितांकडून हस्तगत केलेल्या दुचाकींचा पंचनामा करून त्या अमळनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत. दोघांनी आणखी काही चोरीच्या घटना केल्या आहेत का, याचा तपास सुरू आहे. तसेच सदर गुन्हाचा पुढील तपास पोहेकॉ काशिनाथ पाटील, पोकॉ सागर साळंखे हे करित आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक शरद काकळीज, हवालदार प्रशांत पाटील, गणेश पाटील, उज्वलकुमार म्हसके, नितीन मनोरे, उज्वल पाटील आणि हितेश बेहरे यांनी ही कारवाई यशस्वी केली.


हेही वाचा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्य कार्यशाळा संपन्न

बातमी शेअर करा !
Share
Tags: amalner policejalgaon policemarathi newsmarathi updatessp dr maheshwar reddystolen bikessuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page