• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon News : सुपोषित जळगाव उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 16, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Jalgaon News : सुपोषित जळगाव उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन

जळगाव, 15 नोव्हेंबर : यंग इंडिया फिट इंडिया या अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘सुपोषित जळगाव’ या विशेष उपक्रमाचा जिल्हाभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आरोग्याबाबत जनजागृती वाढविणे, कुपोषण निर्मूलन, तसेच नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीची सवय लागावी यासाठी या मोहिमेअंतर्गत प्रत्येक आठवड्यात विविध आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात.

या अनुषंगाने शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी जिल्हाभरातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये सामूहिक सूर्यनमस्कार हा उपक्रम भव्य प्रमाणात संपन्न झाला. या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ तसेच स्वयंसेवी संस्था उत्साहपूर्वक सहभागी झाल्या.

सूर्यनमस्काराच्या माध्यमातून शरीरातील लवचिकता वाढते, शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती सुधारते तसेच सर्वांगीण आरोग्यास मोठ्या प्रमाणात लाभ होतो. या पार्श्वभूमीवर सुपोषित जळगाव मोहिमेअंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. प्रत्येक आरोग्य केंद्रात आरोग्यविषयक मार्गदर्शन, पोषणाचे महत्त्व, स्वच्छतेच्या सवयी, योग व व्यायामाचे फायदे याबाबत जनजागृतीही करण्यात आली.

सुपोषित जळगाव या मोहिमेंतर्गत दर शनिवारी विविध आरोग्य उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनी या उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहता जिल्हा प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा मानस आहे.

हेही वाचा : आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsjalgaon zpsurya namaskarsuvarna khandesh livezp ceo minal karanwal

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page