भुसावळ, 24 नोव्हेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून राज्यातील नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून नगरपरिषद तसेच नगरपंचायत निवडणुकीसाठी भुसावळात त्यांची प्रचार सभा पार पडणार आहे. भुसावळमधील नाहटा कॉलेजसमोर आज दुपारी 4.30 वाजता त्यांची प्रचार सभा होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भुसावळात जाहीर सभेचे आयोजन –
जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका तसेच नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. तत्पुर्वी त्यांची शहाद्यात देखील प्रचार सभा होणार असून ती सभा आटोपल्यानंतर त्यांचे दुपारी भुसावळात आगमन होणार आहे. यानंतर दुपारी 4.30 वाजता मुख्यमंत्री फडणवीस सभास्थळी हजर होणार आहेत.
‘असे’ आहे दौऱ्याचे नियोजन –
- दुपारी 03.30 वाजता – हेलिपॅड-साने गुरुजी विद्यालय प्रांगण, लोणखेडा, शहादा येथे आगमन.
- दुपारी 03.35 वाजता – हेलिकॉप्टरने भुसावळ जि. जळगावकडे प्रयाण.
- सायंकाळी 04.15 वाजता – हेलिपॅड-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, भुसावळ येथे आगमन.
- सायंकाळी 04.20 वाजता – मोटारीने नाहटा कॉलेज समोर, भुसावळकडे प्रयाण.
- सायंकाळी 04.25 वाजता – नाहटा कॉलेज समोर, भुसावळ येथे आगमन.
- सायंकाळी 04.25 वाजता – भुसावळ नगर परिषद प्रचार सभा.
- सायंकाळी 05.10 वाजता – मोटारीने हेलिपॅड-बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ, जि. जळगाव कडे प्रयाण.
- सायंकाळी 05.15 वाजता – हेलिपॅड-बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ, जि. जळगाव येथे आगमन.
- सायंकाळी 05.20 वाजता – हेलिकॉप्टरने जळगाव कडे प्रयाण.
- सायंकाळी 05.30 वाजता – जळगाव विमानतळ येथे आगमन.
- सायंकाळी 05.40 वाजता – विमानाने शिर्डी, जि. अहिल्यानगर कडे प्रयाण.
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे जळगाव जिल्ह्यातील भाजप उमेदवार-
- साधना गिरीश महाजन – जामनेर
- रजनी संजय सावकारे – भुसावळ
- श्यामल अतुल झांबरे – वरणगाव
- भावना ललित महाजन – मुक्ताईनगर
- साधना नितीन चौधरी – चोपडा
- रोहिणी उमेश फेगडे – यावल
- दामिनी पवन सराफ – फैजपुर
- प्रतिभा मंगेश चव्हाण – चाळीसगाव
- रेणुका राजेंद्र पाटील – सावदा
- संगिता भास्कर महाजन – रावेर
- गोविंद मुरलीधर अग्रवाल – शेंदुर्णी
- योगेश नारायण पाटील – नशिराबाद
- सुचेता दिलीप वाघ – पाचोरा
- सुशिलाबाई शांताराम पाटील – भडगाव
- डॉ. नरेंद्र धुडकू ठाकूर – एरंडोल






