• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“श्री राम सुतार जी यांच्या निधनाने मन अत्यंत दुःखी!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून वाहिली श्रद्धांजली

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 18, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
“श्री राम सुतार जी यांच्या निधनाने मन अत्यंत दुःखी!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून वाहिली श्रद्धांजली

मुंबई, 18 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम सुतार यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत मराठीतून श्रद्धांजली वाहिली असून श्री राम सुतार जी यांच्या निधनाने मन अत्यंत दुःखी झाले असल्याचे त्यांनी म्हटलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून वाहिली श्रद्धांजली –

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टवर म्हटलंय की, श्री राम सुतार जी यांच्या निधनाने मन अत्यंत दुःखी झाले आहे, त्यांच्या अद्वितीय शिल्पांच्या माध्यमातून भारताला काही प्रतिष्ठीत मानचिन्हे लाभली, त्यात केवाडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी हे प्रतीकात्मक शिल्प विशेष उल्लेखनीय आहे.

दरम्यान, त्यांच्या कलाकृती भारताच्या इतिहास, संस्कृती आणि सामूहिक चेतनेचे प्रभावी दर्शन घडवतात. राष्ट्राभिमानाला त्यांनी शाश्वत रूप देत पुढील पिढ्यांसाठी एक अमूल्य वारसा निर्माण केला आहे. त्यांच्या कलाकृती कलाकार आणि नागरिकांना सदैव प्रेरणा देत राहतील. त्यांचे कुटुंब, चाहते आणि त्यांच्या महान जीवनकार्याचा प्रभाव असलेल्या सर्वांप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. ॐ शांती.

काही दिवसांपुर्वीच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित –

राम सुतार यांनी देश-विदेशात साकारलेल्या 200 हून अधिक शिल्पांमुळे ते कलाजगतात अजरामर झाले आहेत. दिल्लीतील संसद भवनाच्या प्रांगणात उभारलेली शिल्पे ही त्यांच्या कलाकृतींची साक्ष देतात. राम सुतार यांना पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषण यांसारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन स्वतः त्यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला होता. त्या वेळी त्यांनी महाराष्ट्र अभिमान गीत गाऊन उपस्थितांना भावूक केले होते.

अंदमान येथे अलीकडेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले असून तो पुतळाही राम सुतार यांनीच साकारला होता. त्यांच्या शिल्पांमधील सूक्ष्म बारकावे, कलाकुसर आणि जिवंतपणा हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रावर मोठा शोककळा पसरली असून, देशाने एक महान कलाकार गमावला आहे.

वयाच्या 22व्या वर्षी आयुष्यात पहिले शिल्प तयार –

धुळे शहरापासून 2 ते 3 मैलावर असणाऱ्या गोंदूर या गावी वंजी सुतार यांच्या कुटुंबात 19 फेब्रुवारी 1925 रोजी राम सुतार यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वंजी हंसराज सुतार हे व्यवसायाने सुतार होते. त्यामुळे कलेचा संस्कार त्यांना घरातूनच मिळाला. शेतीसाठी लागणारी अवजारे, बैलगाडी आदी वस्तू त्यांचे वडील खूपच आखिव रेखीव पद्धतीने तयार करीत असत. त्यातूनच त्यांना चित्र रेखाटण्याची व शिल्प साकारण्याची आवड निर्माण झाली. शालेय जीवनात शिक्षकांनी माझ्यातील कलाकार ओळखून दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांच्यातील कलाकाराची पायाभरणी झाली. गावात चौथीपर्यंत शाळा असल्याने पुढे पाचवी शिकायला म्हणून निमजाळे या गावातील शाळेत प्रवेश घेतला. सहा फूट उंचीच्या पहीलवानाचा सिमेंटचा पुतळा साकारून 1947 मधे सुतार यांनी आयुष्यात पहिले शिल्प तयार केले.

शिल्पातून मिळालेली पहिली कमाई –

पुढे धुळ्यातील शिक्षक प्रशिक्षण संस्थेत ते जाऊन इथेच त्यांनी चित्रकलेच्या प्राथमिक परिक्षाही उत्तीर्ण केल्या. त्यांच्या उत्तम कामामुळे इथेच त्यांना चित्रकलेतून पैसेही मिळायचे. शिक्षक प्रशिक्षण केंद्रात शिक्षकांना मॉडेल व चित्र तयार करून देण्याच्या मोबदल्यात त्यांना प्रती वस्तू 5 रूपये मिळकत मिळायची. दरम्यान, 1948 साली शिक्षक प्रशिक्षण केंद्रातील शिक्षक श्रीरामकृष्ण जोशी यांच्याकडून महात्मा गांधी यांचे सिमेंटचे शिल्प तयार करण्याची ऑर्डर मिळाली. त्यांनी महात्मा गांधीचे चार फुटांचे सिमेंटचे शिल्प तयार केले. या मोबदल्यात त्यांना 100 रूपये मिळाले. ही शिल्पातून मिळालेली त्यांची पहिली कमाई होती.

रामकृष्ण जोशी यांच्या मदतीने राम सुतार मुंबईला गेले व माटुंग्यात राहू लागले. 1949 मध्ये त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधे प्रवेश घेतला. शैक्षणिक योग्यतेमुळे त्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळाला व त्यांनी चार वर्षातच शिक्षण पूर्ण केले. इथेही त्यांनी चारही वर्ष प्रथम येण्याचा मान मिळवत मेयो पदक पटकाविले. यानंतर त्यांनी जे.जे. म्हात्रे आणि करमरकर या तत्कालीन प्रसिद्ध शिल्पकारांसोबत काम केले.

याच काळात केंद्रीय लोकसेवा आयोगाने वेरूळ व अंजिठा या जगप्रसिद्ध लेण्यांच्या देखभालीसाठी आर्टीस्टची परीक्षा घेतली. ही परीक्षा उत्तीर्ण करून सुतार यांनी 1954 ते 1958 या कालावधीत या लेण्यांतील मुर्त्यांच्या डागडूजीचे काम यशस्वीपणे केले. 1959 मध्ये त्यांनी दिल्लीस्थित केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत जाहीरात व दृष्य प्रचार संचालनालयाची (डीएव्हीपी) नोकरी स्वीकारली आणि तेव्हापासूनच ते दिल्लीत स्थायिक झाले.

आयुष्याला कलाटणी अन् नोकरीचा राजीनामा –

दिल्लीतील प्रगती मैदानावरील कृषी प्रदर्शनात सुतार यांनी उभारलेला शेतकऱ्याचा पुतळा अधिकाऱ्यांना फारच आवडला व त्यांनी लगेच सुतारांची भेट घेऊन त्यांना दोन शेतकरी जोडप्याचे दोन पुतळे बनविण्याची ऑर्डर दिली. त्यांनी शेतकरी महिला व पुरूष असे प्रत्येकी 13 फुटाचे दोन पुतळे तयार केले त्याचा मोबदला म्हणून सुतार यांना 15 हजार रुपये मिळाले. हा क्षणच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. सरकारी नोकरीत राहून तूम्ही हे काम करू शकत नाही असे त्यांच्या डीएव्हीपीतील अधिकाऱ्याने सांगितले. सुतार यांनाही आता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कला दाखविण्यासाठी स्वतंत्र काम करण्याची निकड भासू लागल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.

संसदेच्या आवारात उभारण्यात आलेले महापुरूषांचे 16 पुतळे आणि महात्मा गांधीच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विदेशात महात्मा गांधीचे पुतळे उभरण्याचे काम करीत जवळपास 80 देशांमधे गांधीसह इतर 350 पुतळे उभारण्याची किमया खान्देशचे सुपूत्र असलेल्या राम सुतार यांनी साध्य केली आहे.

गुजरातमध्ये बसविण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचेही ते आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांनी काम केले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याबाबत सांगायचे झाले तर त्या पुतळ्याची प्रत्यक्ष उंची 522 फूट आहे. सरदारांच्या पुतळ्याची उंची नदीपात्रापासून 607 फूट (182 मीटर) आहे. एकात्मतेचे स्मारक (स्टॅच्यू ऑफ युनिटी) म्हणून नामाभिधान केलेला सरदारांचा पुतळा सरदार सरोवर धरणाजवळील साधू बेटावर उभा केला आहे.

2016 मध्ये 1 कोटींचा पुरस्कार जाहीर –

अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलचे प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटरचा पुतळा ही तिन्ही शिल्पे राम सुतार यांच्या कल्पनेतूनच साकारत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा 2016 या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला. एक कोटी रुपये, प्रमाणपत्र आणि पारंपारिक हस्तकला शिल्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

संसदेच्या आवारात उभारले 16 पुतळे –

राम सुतार यांनी संसदेच्या आवारात महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह देशाला मार्गदर्शक ठरणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचे 16 पुतळे सुतार साकारले आहेत. 16 ते 18 फुटांच्या धातूनिर्मित या पुतळ्यांनी लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराला वेगळी उंची प्रदान केली आहे.

राम सुतावर यांच्यावर महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा प्रभाव आहे. ते जेमतेम दुसरीत असतानाच गांधीजींनी त्यांच्या गावाला भेट दिली होती. सुतार यांच्या कलात्मक हातातून गुजरातमधील गांधीनगर येथे सचिवालयात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधीजींच्या अलौकीक शिल्पासाठीच त्यांना पद्मश्री या मानाच्या नागरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.


हेही वाचा : आयडॉल शिक्षक शाळेसोबतच समाजातही मोठा बदल घडवून आणतील – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsnarendra modiram sutarram sutar passes awaysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

February 18, 2026
भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

February 18, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

February 18, 2026
जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

February 18, 2026
आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

February 17, 2026
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य – विजया रहाटकर

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य – विजया रहाटकर

February 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page