• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

धक्कादायक! भांडुपमध्ये BEST बसच्या धडकेत चार जणांचा मृत्यू; 9 जखमी, सरकारकडून मदत जाहीर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 30, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
धक्कादायक! भांडुपमध्ये BEST बसच्या धडकेत चार जणांचा मृत्यू; 9 जखमी, सरकारकडून मदत जाहीर

मुंबई, 30 डिसेंबर : भांडुप (पश्चिम) परिसरात सोमवारी 29 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास बेस्ट बसच्या अपघाताची धक्कादायक घटना घडली. भांडुपच्या स्टेशन रोड परिसरात BEST च्या भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बसने रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना धडक दिल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 9 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त करित मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भांडुप पश्चिम स्टेशन रोड या गजबजलेल्या परिसरात आकाराने मोठी असलेली इलेक्ट्रिक BEST बस मागे घेत असताना चालकाचा ताबा सुटला. यावेळी बसने रस्त्यावर असलेल्या 13 नागरिकांना चिरडले. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.  वर्षा सावंत (25 वर्षे), मानसी मेघश्याम गुरव (49 वर्षे), प्रशांत शिंदे (53 वर्षे), प्रणिता संदीप रसम (35 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

तर 9 जण जखमींमध्ये नारायण भिकाजी कांबळे, मंगेश मुकुंद दुखांडे, ज्योती विष्णू शिर्के, प्रशांत दत्ताराम लाड, शीतल प्रकाश हाडवे , दिनेश विनायक सावंत, पूर्वा संदीप रसम, प्रताप गोपाळ कोरपे, रवींद्र सेवाराम घाडीगावकर आणि रामदास शंकर रूपे यांचा समावेश असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक दृश्ये –

भांडुप बस अपघातप्रकरणी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की चालकाचा ताबा सुटल्याने, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात रस्त्याच्या कडेला उभे असलेले प्रवासी अचानक मागे येणारी बस पाहून जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत. या फुटेजमध्ये बसच्या चाकाखाली एक व्यक्ती चिरडल्याचे धक्कादायक दृश्य स्पष्टपणे कैद झाले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा –

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की, मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 9 जण जखमी झाले असून त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल.

हेही वाचा : “महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास” म्हणता, मग दोन्ही राष्ट्रवादी…!” अजित पवारांच्या घोषणेनंतर अंजली दमानिया यांची जोरदार टीका

बातमी शेअर करा !
Share
Tags: best bus accidentbhandup best bus accidentmumbai marathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | ‘राष्ट्रीय महामार्गावरचं गाव आहे पण बसस्थानक नाही!’, चार वर्षांपासून रखडला लासगावातील बसस्थानकाचा प्रश्न

VIDEO | ‘राष्ट्रीय महामार्गावरचं गाव आहे पण बसस्थानक नाही!’, चार वर्षांपासून रखडला लासगावातील बसस्थानकाचा प्रश्न

June 20, 2026
आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अडावद येथे वृक्षारोपण व गोसेवेचा उपक्रम

आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अडावद येथे वृक्षारोपण व गोसेवेचा उपक्रम

June 20, 2026
पिंप्री खु. येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन

पिंप्री खु. येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन

June 20, 2026
अवैध धंद्यांविरोधात महिलांनी निर्भयपणे पुढे यावे : एपीआय कल्याणी वर्मा

अवैध धंद्यांविरोधात महिलांनी निर्भयपणे पुढे यावे : एपीआय कल्याणी वर्मा

June 20, 2026
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार वाढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार वाढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 20, 2026
VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

June 19, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page