• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Video | ‘पाचोऱ्यात पाण्याची योजना आणण्यासाठी प्राधान्य’; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आश्वासन

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सुनिताताई पाटील यांचा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण समारंभ संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 3, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या, व्हिडीओ
Video | ‘पाचोऱ्यात पाण्याची योजना आणण्यासाठी प्राधान्य’; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आश्वासन

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

पाचोरा, 3 जानेवारी : पाचोऱ्यातील सध्यास्थितीत पाणी प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी पंधरा दिवसात आमच्या विभागामार्फत डीपीआर तयार करण्यात येईल आणि यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजुरी घेऊन पुन्हा त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येईल. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार असून पाचोऱ्यात पाण्याची योजना आणण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण समारंभ संपन्न –

राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती आणि सावित्रीबाई फुले जयंतीतसेच महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिर व सुनिताताई किशोर पाटील यांचा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण समारंभ पाचोरा शहरातील मानसिंगका मैदानावर आज 3 जानेवारी रोजी दुपारी पार पडला. यावेळी ते बोलत होते.

‘डीपीआर तयार करून योजनेला चालना दिली जाईल’ –

पाण्याच्या योजनेसाठी प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर रस्ते खोदले जातील आणि त्यानंतर त्यांची दुरूस्ती केली जाईल. म्हणून पाणी योजनेचे काम करत असताना नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शहरातील तयार झालेल्या सुंदर रस्त्यांचे जास्त नुकसान होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जाणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले. दरम्यान, 135 लिटर प्रति व्यक्ती पाणी कसे मिळेल या उद्देशाने डीपीआर तयार करून येत्या उन्हाळी अधिवेशनापर्यंत पाणी योजनेला चालना देण्याचे काम केले जाणार असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

‘निवडणुकीत लाडक्या बहिणींचा मोठा प्रतिसाद’-

नगरपरिषद निवडणुकीदरम्यान पाचोरा आणि भडगाव शहरात माझ्या सभा पार पडल्या. यावेळी त्या जाहीरसभांना मिळालेल्या प्रतिसादावरून शिवसेनेचा विजय पक्का होता, असा विश्वास निर्माण झाला. यामध्ये लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत शिवसेनेचा विजय निश्चित केल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. दरम्यान, पाचोऱ्यात आता विरोधकांची काहीही ताकद उरली नसून त्यांच्याबाबत काही बोलू नका, असा सल्लाही मंत्री पाटील यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिला.

‘बचत गटाच्या महिलांसाठी उद्योगनिर्मितीचे काम होणार’ –

महिला बचत गटाच्या महिलांसाठी सोलर प्रकल्प योजनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याबाबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, सोलर प्रकल्पाची योजना ही माझ्या मतदारसंघातील आसोदा आणि पाळधीतही राबवली जातेय. सोलरमुळे घरगुती वीज ग्राहकांच्या वीजबिल कमी करण्यात मदत होते. यासोबतच, बचत गटाच्या महिलांसाठी उद्योगनिर्मितीचे काम होणार आहे. म्हणून, बचत गटातील महिलांसाठी ही योजना फायदेशीर असून ती योजना समजून घेतली पाहिजे. दरम्यान, बचत गटाच्या महिलांसाठी जळगावात सुरू करण्यात आलेली बहिणाई मार्टची संकल्पना आता राज्यात राबविले जात असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.


‘नगराध्यक्षा-नगरसेविकांनी चांगलं काम करावं’ –  

लोकशाहीत निवडणूक संपली की सगळ्या गोष्टी संपतात. यामुळे नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांनी निवडणुकीतील घडामोडी विसरून त्यांच्याकडे कामे घेऊन आलेल्या व्यक्तींचा आदर करून त्यांची कामे करावीत. ज्या नेत्याचे नगरसेवक चांगले काम करतात, त्या नेत्याला शहरात मोठं लीड मिळतं. नगरपरिषदेत निवडून येण्यामध्ये महिलांची संख्या जास्त असून पुरूषांपेक्षा महिलांची कामे मोठ्या प्रमाणात होतील, अशी मला खात्री असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, पाचोरा नगरपरिषदेत निवडून आलेले नवनियुक्त नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, गटनेता, नगरसेवक-नगरसेविका तसेच पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार –

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या समारोपानंतर नवनियुक्त नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक आणि नगरसेविकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर पाचोरा नगराध्यक्ष पदाचा पदभार सुनिताताई पाटील यांनी तर उपनगराध्यक्ष पदाचा पदभार किशोर बारावकर यांनी स्वीकारला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील तसेच नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश देवरे यांनी नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा : mpsc chairman : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती

बातमी शेअर करा !
Share
Tags: minister gulabrao patilmla kishor appa patilpachora newssuvarna khandesh livewater supply scheme

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page