यावल, 10 जानेवारी : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे येत्या 3 फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत असून, या अधिवेशनात मतदारसंघातील जनतेच्या समस्या, प्रलंबित मागण्या आणि विकासाचे महत्त्वाचे मुद्दे सभागृहात प्रभावीपणे मांडण्यासाठी ‘आपले प्रश्न माझा आवाज’ हा उपक्रम हाती घेतलाय.
आमदार अमोल जावळेंचे जनतेला आवाहन –
लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या अडचणी, स्थानिक प्रश्न आणि विकासाशी संबंधित बाबी शासनाच्या निदर्शनास आणणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत, “आपले प्रश्न माझा आवाज; रावेर–यावलच्या विकासाचा नवा ध्यास” या संकल्पनेतून त्यांनी नागरिकांना थेट सहभागाचे आवाहन केले आहे.
आपले प्रश्न WhatsApp द्वारे आमदारांपर्यंत पोहचवा –
मतदारसंघातील नागरिकांनी आपल्या समस्या, मागण्या आणि महत्त्वाचे प्रश्न थेट आमदारांपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. यासाठी २२ जानेवारी २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली असून, नागरिकांना WhatsApp द्वारे 8788420804 या क्रमांकावर आपली माहिती पाठवता येणार आहे.
“आपला सहभाग, मतदारसंघाचा विकास” –
स्थानिक विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते आदी विषयांवर अधिवेशनात ठोस पाठपुरावा होणार असल्यामुळे या उपक्रमाकडे मतदारसंघात सकारात्मक अपेक्षेने पाहिले जात आहे. “आपला सहभाग, मतदारसंघाचा विकास” या भूमिकेतून आमदार अमोल जावळे यांनी जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.






