नाशिक, 12 जानेवारी : नाशिकमध्ये पार पडणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात तयारी केली जात आहे. तपोवनातील झाडे छाटण्याच्या मुद्द्यावरून नाशिकमधील जाहीरसभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली होती. दरम्यान, राज ठाकरेंचा मंत्री गिरीश महाजन यांनी समाचार घेत जोरदार पलटवार केला आहे.
राज ठाकरेंनी केली होती टीका –
बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं की, संजय राऊत म्हणाले तसे, यांना तपोवनातील झाडे छाटायची आहेत. त्या महाजनपेक्षा तो लाकूडतोड्या बरा होता; जो सोन्या-चांदीच्या कुऱ्हाडीला भुलला नाही. पण, हे लोक झाडं छाटण्याआधी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते आणि माणसे छाटतात. बाहेरून झाडे मागवून ती आता पक्षात लावली जात आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आयोजित सभेतून गिरीश महाजन यांच्यावर केली होती.
राज ठाकरेंच्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांचे प्रत्युत्तर –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित केलेले सभेत मंत्री गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तपोवन परिसरात साधू-संतांच्या पारंपरिक निवासासाठी आवश्यक तयारी सुरू आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत आपोआप उगवलेल्या छोट्या-मोठ्या झाडांवरून मुद्दाम वाद निर्माण केला जात आहे. पर्यावरणप्रेमींच्या नावाखाली काही डाव्या विचारसरणीचे लोक धार्मिक कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, मी स्वतः 20 हजार झाडे लावून त्यांचे संगोपन करत आहे. तरीही केवळ टीआरपीसाठी माझ्यावर आरोप केले जात असून आदित्य ठाकरे यांना देखील आता जाग आली, ते झाडाला मिठी मारून गेले. राज ठाकरे काहीही बोलतात आणि मुख्यमंत्र्यांवरही टीका करतात. मला लाकूडतोड्या म्हणतात; बोलू द्या, ते मोठे आहेत, असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले. आम्ही मोठी झाडे तोडणार नाही, ही ग्वाही अनेकदा दिली असून आतापर्यंत आंध्र प्रदेशातून सात ते आठ हजार झाडे आणून लावण्यात आली असून उर्वरित झाडांची लागवडही सुरू असल्याचेही मंत्री महाजन यांन स्पष्ट केले.
View this post on Instagram
हेही वाचा : महानगरपालिका निवडणूक 2026 | जळगाव आणि धुळ्यात बदलती राजकीय समीकरणे, कोणाची कोणासोबत युती?






