जळगाव, 13 ऑगस्ट : नव्या पिढीसाठी देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास पुन्हा एकदा चित्रप्रदर्शनातून मांडण्यात आला आहे. विद्यार्थी, पालक यांनी या चित्रप्रदर्शनाला भेट देऊन देशाचा इतिहास समजून घ्यावा. जो इतिहास समजून घेईल तो इतिहास निर्माण करू शकतो, या विचाराने जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, संघटना प्रतिष्ठान यांनी या चित्रप्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या केन्द्रीय संचार ब्यूरो व क्षेत्रीय कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगांव बस स्थानकात मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार उन्मेश पाटील यांनी केले. याप्रसंगी केंद्रीय संचार ब्यूरो प्रबंधक संतोष देशमुख, पंचायत समिती उपसभापती भाऊसाहेब पाटील, नायब तहसीलदार संदेश निकुंभ, प्रचार अधिकारी प्रदीप पवार, अॅड. प्रशांत पालवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुरूवातीला शाहीर महर्षी आत्माराम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी जय जय महाराष्ट्र गीत सादर केले.
यावेळी खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते आणीबाणीतील सुरेश शेटे, त्रिदल सेनेचे गोकुळ फौजी पाटील, शेतकरी नेते आर. के. पाटील, बचत गट, पोस्ट विभाग यांसह विविध गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांना पंच प्रण शपथ देण्यात आली. भारत माता की जय घोषणेने बस स्थानक दणाणले. कार्यक्रमात ‘केंद्र शासनाचे 9 नऊ वर्ष सेवा सुशासन आणि गरीब कल्याण’ या पुस्तिकेचे विमोचन व वाटप करण्यात आले.
यावेळी खासदार उन्मेश पाटील यावेळी म्हणाले, मेरी माटी मेरा देश, आजादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा, केंद्र शासनाचे 9 नऊ वर्ष सेवा, सुशासन व गरीब कल्याणाची या चित्रप्रदर्शनी तीन दिवस सुरु राहणार असून या डिजिटल प्रदर्शनीला भेट द्यावी, या चित्रप्रदर्शनीला 25 हजार विद्यार्थी , पालक नागरीक, प्रवाशी भेट देतील. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांकडून शंभरीकडे जाताना हा चित्रमय इतिहासातून उत्साह घेऊन जाता येईल, तसेच चित्रप्रदर्शनीतून सर्वांना शिकता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचे स्वप्न आहे आणि आपल्या सर्वांना त्यांना पाठबळ द्यायचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख व आभार प्रदर्शन केंद्रीय संचार ब्यूरोचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार यांनी केले. चित्रप्रदर्शनीच्या ठिकाणी तहसील कार्यालयाचे वोटिंग जनजागृती, एकात्मिक बाल विकास, पोस्ट विभाग, माहितीपर लावण्यात आले आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता केंद्रीय संचार ब्यूरोचे सहयक क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार, सहकारी प्रिती पवार, बापू पाटील, किरण कुमार यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मुकेश पवार यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.