• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव ‘जातमुक्त गाव’ म्हणून घोषित; विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 13, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव ‘जातमुक्त गाव’ म्हणून घोषित; विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर

अहिल्यानगर, 13 फेब्रुवारी: देशात आजही अनेक ठिकाणी जाती-पातीचं राजकारण आणि भेदभाव पाहायला मिळतो. जातीचा अभिमान बाळगण्याची आणि त्यादृष्टीने कृत्ये केल्याची उदाहरणे अनेकदा समोर येतात. यात ऑनर किलिंग, सामाजिक बहिष्काराच्या घटनाही घडतात. मात्र, अहिल्यानगर  जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव ‘जातमुक्त गाव’ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. तसा ठराव विशेष ग्रामसभेत मंजूर करण्यात आला असून रक्तदान शिबीर घेऊन त्यानंतर जातमुक्तीचा ठराव घेण्यात आला.

काय आहे संपुर्ण बातमी? –

नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावात जात, धर्म, पंथ किंवा वंशाच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही आणि सर्व रहिवाशांना समान वागणूक दिली जाईल. “गावकऱ्यांनी एकत्रितपणे ‘माझी जात – मानव’ ही भावना स्वीकारण्याचा संकल्प केला. सरकारी सेवा, जलस्रोत, मंदिरे, स्मशानभूमी, शाळा आणि सामाजिक कार्यक्रमांसह सर्व सार्वजनिक ठिकाणे आणि सुविधा सर्व रहिवाशांसाठी भेदभाव न करता खुल्या राहतील,” असे ठरावात म्हटले आहे.

ग्रामसभेने असाही ठराव केला की कोणताही ग्रामस्थ अस्पृश्यता, सामाजिक बहिष्कार किंवा सामाजिक अन्याय घडवून आणणारा कोणताही मजकूर पोस्ट किंवा प्रचार करणार नाही आणि उल्लंघन झाल्यास आवश्यक ती कारवाई केली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय.

या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंझाडे यांनी दिलेल्या मार्गदर्शन आणि प्रेरणाची कदर करणारा हा ठराव शरद बाबुराव अरगडे यांनी मांडला आणि बाबासाहेब मच्छिंद्र बोधक यांनी त्याला अनुमोदन दिले. तो राज्य सरकारकडे नोंदीसाठी आणि पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे.

‘जात मुक्त गाव’चा निर्णय –

सौंदाळा गावची लोकसंख्या २५०० एवढी आहे. शेती हा इथल्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. सौंदाळा गाव हे कायमच समाजहिताचे, प्रगत आणि प्रेरणादायी निर्णय घेणारे गाव म्हणून ओळखले जाते. याआधी शिवीगाळ बंदी, विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध योजना तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाचे ठराव सौंदाळा ग्रामपंचायतीमार्फत मंजूर करण्यात आले आहेत. एकीकडे जातीय तेढ वाढत असताना, आता सौंदाळा गावाने घेतलेला ‘जात मुक्त गाव’चा हा निर्णय महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

हेही वाचा : Jalgaon News: परीक्षा काळात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: ahilyanagar newscaste-free villagesaundala villagesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page