• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 18 | स्वातंत्र्यानंतर सुरळीत हस्तांतरणासाठी भारतात थांबलेले तीन ब्रिटिश पदाधिकारी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 14, 2026
in ताज्या बातम्या, साहित्य-परंपरा
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 18 | स्वातंत्र्यानंतर सुरळीत हस्तांतरणासाठी भारतात थांबलेले तीन ब्रिटिश पदाधिकारी

मुंबई, 3 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘राजभवनाचे किस्से’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जातो. दरम्यान, आता या राजभवनाचे नाव बदलून लोकभवन करण्यात आले आहे. त्यामुळे आता आमच्या किस्से राजभवनाचे या मालिकेचे नावही आम्ही किस्से लोकभवनाचे असे करत असून या मालिकेचा हा 18 वा लेख आहे.

दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रशासनाच्या सुरळीत हस्तांतरणासाठी देशातील तीन महत्वाच्या पदावर आसनस्थ असलेल्या ब्रिटिश पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्यात आले होते. अर्थात केंद्र शासनाच्या सूचनेनुसारच ते भारतात थांबले होते.

यातील पहिले होते गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन. दुसरे होते तत्कालीन मुंबई प्रांताचे ब्रिटिश गव्हर्नर राईट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिल आणि तिसरे होते मद्रास प्रांताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर सर आर्चिबाल्ड नाय !

ब्रिटिश संसदेने पारित केलेल्या इंडियन इंडिपेन्डेन्स ऍक्ट १९४७ नुसार भारतातील व्हाइसरॉय पद संपुष्टात आले, परंतु गव्हर्नर जनरल पद कायम ठेवण्यात आले. प्रशासनाच्या सुरळीत हस्तांतरणासाठी माऊंटबॅटन यांना भारताचे ‘गव्हर्नर जनरल’ म्हणून कायम ठेवण्यात आले व ते दिनांक २१ जून १९४८ पर्यंत त्या पदावर कार्यरत होते.

दिनांक २२ जून १९४८ ते २६ जानेवारी १९५० या कालावधीत चक्रवर्ती राजगोपालाचारी हे भारताचे गव्हर्नर जनरल होते.  देश प्रजासत्ताक होईपर्यंत भारत हे ब्रिटनचे स्वतंत्र अधिराज्य (Independent Dominion) होते.

प्रजासत्ताक झाल्यावर ‘गव्हर्नर जनरल’ हे पद देखील संपुष्टात आले व राष्ट्रपती पद अस्तित्वात आले. दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी डॉ राजेंद्र प्रसाद देशाचे राष्ट्रपती झाले.

मुंबईतील हस्तांतरण –

शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जॉन कॉलव्हिल दिनांक ५ जानेवारी १९४८ पर्यंत – म्हणजे स्वातंत्र्यानंतर साडेचार महिने – मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. मुंबईचे मुख्यमंत्री होते बाळ गंगाधर खेर.

दिनांक ६ जानेवारी १९४८ रोजी कपूरथाळा पंजाब येथील राजघराण्यातील राजा महाराज सिंह मुंबई प्रांताचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.

मद्रासमध्ये शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर आर्चिबाल्ड नाय हे दिनांक ७ सप्टेंबर १९४८ पर्यंत मद्रास प्रांताचे गव्हर्नर म्हणून पदावर होते. त्या दिवशी भावनगरचे संस्थानिक असलेले, महाराज कृष्ण कुमारसिंहजी भावसिंहजी हे मद्रासचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.

आर्चिबाल्ड नाय त्यानंतर ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त झाले. स्वातंत्र्यानंतर मद्रासचे पहिले मुख्यमंत्री होते ओ पी रामास्वामी रेड्डीयार. भारत प्रजासत्ताक झाल्यावर केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशातील सर्व राज्यपालांनी, मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी व मुख्य न्यायाधीशांनी दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी आपापल्या पदाची संविधानाला स्मरुन नव्याने शपथ घेतली.

माऊंटबॅटन यांची हत्या व भारतात दुखवटा –

दिनांक २७ ऑगस्ट १९७९ रोजी लॉर्ड माऊन्टबॅटन आयर्लंड येथे गेले असताना त्यांच्या लक्झरी बोटीवर आयआरए संघटनेने घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात त्यांची हत्या झाली.

एका वृत्तपत्रातील मजकुरानुसार त्यावेळी भारतात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रिन्स चार्ल्स (सध्या राजे चार्ल्स तृतीय) भारत भेटीवर येणार होते व ब्रिटनच्या राजघराण्याशी नात्याने निगडित असल्याने माऊन्टबॅटन हे देखील त्यांच्या सोबत येणार होते. चार्ल्स यांची भारत भेट त्यानंतर एक वर्षानी, म्हणजे नोव्हेंबर १९८० साली झाली.

लेखन – श्री. उमेश काशीकर (माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, लोकभवन, मुंबई)

हेही वाचा : किस्से लोकभवनाचे – लेख क्र.16 | “…अन् राज्यपालांनी भर परिषदेत अंगावरील गाऊन काढून टाकला!”, राष्ट्रीय विज्ञान परिषदेतील 1993 सालचा नेमका किस्सा काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: british officialsindiakisse lokbhawanachelokbhawanlokbhawan mumbaimarathi newsspecial seriessuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लासगाव ग्रामसभेत सोलर प्रकल्पासह विविध मुद्द्यांवर ग्रामस्थ आक्रमक; चार तासांहून अधिक काळ चालली ग्रामसभा

लासगाव ग्रामसभेत सोलर प्रकल्पासह विविध मुद्द्यांवर ग्रामस्थ आक्रमक; चार तासांहून अधिक काळ चालली ग्रामसभा

August 27, 2026
जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

August 26, 2026
शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page