• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Breaking! विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 12, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
Breaking! विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 12 मार्च: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून या अधिवेशनाचा हा तिसरा आठवड आहे. तिसऱ्या आठवड्याचा चौथ्या दिवशी सकाळीच एक मोठी बातमी समोर आली असून विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय. विधानभवनाच्या इमारतीची तपासणी करून कर्माचाऱ्यांना बाहेरच रोखण्यात आलं.

विधिमंडळ परिसरात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त –

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्र विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विधिमंडळ परिसरात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर प्रशासनात तात्काळ हालचाल सुरू झाली असून सुरक्षेच्या दृष्टीने इमारत रिकामी करण्यात आली आहे. सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना गेटवर थांबवण्यात आले असून परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सुरक्षा उपाययोजना अधिक कडक –

मिळालेल्या माहितीनुसार, विधानभवन बॉम्बने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. या ई-मेलची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संपूर्ण परिसराची तपासणी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून या धमकीमागील स्रोताचा शोध घेतला जात असून सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत.

सभापती राम शिंदे यांचा माध्यमांसोबत संवाद –

विधानभवन बॉम्बने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. अशातच सभापती राम शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी सीपीएच्या मेलवर धमकीचा मेल प्राप्त झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याकारणाने बॉम्बची तसेच मिसाईलची धमकी देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक चौकशी आणि तपासणी करण्याची गरज होती. त्या अनुषंगाने बीडीडीएस आणि डॉग स्कॉड यांनी विधानभवनात प्रवेश करून सखोल अशी तपासणी सुरू आहे. विधानभवनासह आणखी चार महत्वाच्या ठिकाणी बॉम्बची ही धमकी देण्यात आलेली आहे. या पार्श्वभमीवर पोलीस यंत्रणेने आवश्यक ती दखल घेतली असून संपुर्ण तपास सुरू आहे.

थोड्यापुर्वी सुरक्षा अधिकारी तसेच तपास अधिकारी यांच्यात चर्चा पार पडली. या चर्चेनंतर अधिवेशन सुरू असल्याने सर्व अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. विधानसभा पावणे दहाला तर विधानपरिषद दहा वाजता सुरू होणार आहे. अतिशय संवेदनशील तसेच संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेले हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याकारणाने ही धमकी प्राप्त झालेली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण विधानभवनात सखोल तपासणी सुरू असल्याची माहिती सभापती राम शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

बातमी शेअर करा !
Share
Tags: bomb threatbudget 2026vidhanbhavanvidhanbhavan bomb threatvidhanparishad speaker ram shinde

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अट्टल टोळी जेरबंद

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अट्टल टोळी जेरबंद

April 29, 2026
चाळीसगाव येथे 5 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

चाळीसगाव येथे 5 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

April 29, 2026
‘अमृत भारत एक्सप्रेस’चा भुसावळ व जळगाव येथे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ शुभारंभ

‘अमृत भारत एक्सप्रेस’चा भुसावळ व जळगाव येथे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ शुभारंभ

April 29, 2026
मस्साजोगचा धक्कादायक निकाल; दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा अनपेक्षित पराभव

मस्साजोगचा धक्कादायक निकाल; दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा अनपेक्षित पराभव

April 29, 2026
धक्कादायक! धरणगावमध्ये भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

धक्कादायक! धरणगावमध्ये भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

April 29, 2026
मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक; पोलीस कर्मचाऱ्यासह तिघं आरोपींना जळगाव एलसीबीने केली अटक

मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक; पोलीस कर्मचाऱ्यासह तिघं आरोपींना जळगाव एलसीबीने केली अटक

April 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page