• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home व्हिडीओ

VIDEO: बोगस डॉक्टरांविरोधात राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली विधानपरिषदेत महत्वाची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 13, 2026
in व्हिडीओ, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
VIDEO: बोगस डॉक्टरांविरोधात राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली विधानपरिषदेत महत्वाची माहिती

मुंबई, 13 मार्च: राज्यात बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यासाठी शासनाने कायदेशीर तरतुदी केल्या असून जिल्हा, महानगरपालिका व तालुका स्तरावर समित्यांमार्फत सातत्याने आढावा घेतला जात आहे. बोगस डॉक्टरांविरोधात राज्यव्यापी तपासणी मोहीम राबविण्यात येत असून तपासणी मोहिमेत दोषी आढळून आलेल्या बोगस डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य अरुण लाड यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलत होते.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर काय म्हणाले? –

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, बोगस डॉक्टरांविरोधात कारवाईसाठी महानगरपालिकांमध्ये आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या कार्यरत आहेत. तालुका स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या काम करत असून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तत्काळ कारवाई केली जाते. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी पदवी मिळाल्यानंतर संबंधित कायद्यानुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे. आरोग्य विभाग व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समन्वयातून या नोंदणी प्रक्रियेचे आणि नियमांचे काटेकोर पालन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

वैद्यकीय उपचारांदरम्यान डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखालील मेडिकल निग्लिजन्स संदर्भात समिती कार्यरत आहे. या समितीमार्फत अशा  घटनेची चौकशी करून अहवालानुसार आवश्यक कारवाई करण्यात येत, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

ग्रामीण व आदिवासी भागात डॉक्टरांची उपलब्धता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच अशा भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठी प्रोत्साहनपर भत्ते वाढविण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली असून आरोग्य सुविधा अधिक प्रभावी करण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जात असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, चित्रा वाघ, चंद्रकांत रघुवंशी, मनीषा कायंदे, सत्यजित तांबे, जगन्नाथ अभ्यंकर यांनी  सहभाग घेतला.

हेही वाचा: VIDEO | संगणक परिचालकांना मानधन वेळेत देण्यासाठी सरकारने उचलली पावले; ग्रामविकास मंत्र्यांकडून विधानपरिषदेत महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: bogus doctorsbudget 2026inspection against bogus doctorspublic health minister prakash abitkarsuvarna khandesh livevidhanparishad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अट्टल टोळी जेरबंद

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अट्टल टोळी जेरबंद

April 29, 2026
चाळीसगाव येथे 5 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

चाळीसगाव येथे 5 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

April 29, 2026
‘अमृत भारत एक्सप्रेस’चा भुसावळ व जळगाव येथे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ शुभारंभ

‘अमृत भारत एक्सप्रेस’चा भुसावळ व जळगाव येथे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ शुभारंभ

April 29, 2026
मस्साजोगचा धक्कादायक निकाल; दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा अनपेक्षित पराभव

मस्साजोगचा धक्कादायक निकाल; दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा अनपेक्षित पराभव

April 29, 2026
धक्कादायक! धरणगावमध्ये भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

धक्कादायक! धरणगावमध्ये भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

April 29, 2026
मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक; पोलीस कर्मचाऱ्यासह तिघं आरोपींना जळगाव एलसीबीने केली अटक

मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक; पोलीस कर्मचाऱ्यासह तिघं आरोपींना जळगाव एलसीबीने केली अटक

April 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page