लासगाव (पाचोरा), 15 मार्च: पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील तुळसाबाई विजयसिंग पाटील यांचं आज सकाळी वृद्धपकाळाने निधन झाले. लासगाव येथील राहत्या घरी त्यांनी वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, कै. तुळसाबाई विजयसिंग पाटील यांची अंत्ययात्रा आज दुपारी 3 वाजता लासगाव येथील राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुले, सूना तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे.
तुळसाबाई पाटील ह्या विजयसिंग लोटू पाटील यांच्या पत्नी होत्या तर अशोक विजयसिंग पाटील, कन्हैयालाल विजयसिंग पाटील, रवींद्र विजयसिंग पाटील यांच्या आई होत. तसेच किशोर अशोक राठोड, भूपेंद्र रवींद्र पाटील, अमोल अशोक राठोड यांच्या आजी होत. दरम्यान, तुळसाबाई पाटील यांची अंत्ययात्रा आज दुपारी 3 वाजता निघणार आहे.






