• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News: पाचोरा तालुक्यातील पत्रकारांची बैठक संपन्न; बैठकीत विविध मुद्यांवर पार पडली चर्चा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 5, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora News: पाचोरा तालुक्यातील पत्रकारांची बैठक संपन्न; बैठकीत विविध मुद्यांवर पार पडली चर्चा

पाचोरा, 5 एप्रिल: पाचोरा शहर व तालुक्यातील पत्रकारांची बैठक स्व. तात्यासाहेब आर.ओ. पाटील व्यापारी भवन येथे पार पडली. या बैठकीत पत्रकारांसंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पाचोरा तालुका पत्रकार बांधवांची बहुउद्देशीय सहकारी संस्था अथवा औद्योगिक कंपनी स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती पत्रकारांकडून देण्यात आली आहे.

बैठकीच्या प्रारंभी पत्रकारांच्या दैनंदिन समस्या, आर्थिक अस्थैर्य, तसेच उद्योग-व्यवसायाच्या संधी यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी तालुका माझा न्यूजचे संपादक बंडू सोनार यांनी बैठकीचे उद्दिष्ट स्पष्ट करताना पत्रकारांनी केवळ बातम्यांपुरते मर्यादित न राहता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित केली.

याच अनुषंगाने पाचोरा शहर व तालुक्यातील पत्रकारांसाठी बहुउद्देशीय संस्था स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला उपस्थित सर्व पत्रकारांनी एकमताने मंजुरी देत सकारात्मक प्रतिसाद दिला. या निर्णयामुळे पत्रकारांसाठी रोजगारनिर्मिती व आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तसेच जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांसाठी लवकरच एक विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार सी.एन. चौधरी, पत्रकार सुनील पाटील, सचिन सोमवंशी, डॉ. योगेश पाटील यांनी मार्गदर्शन करताना पत्रकारांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी लढा देण्याची गरज व्यक्त केली. “एकजुटीनेच पत्रकारांच्या समस्या सोडविता येतील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी पत्रकार दिलीप जैन, अनिल येवले, राजू धनराळे, किशोर रायसागडा, एन.एस.भुरे, बंडू सोनार, संदीप परदेशी, दिलीप पाटील, प्रवीण मिस्तरी, ईसा तडवी, कुंदन बेलदार, गौतम सोनवणे, राजेंद्र खैरनार, सुनील कोळी, प्रवीण बोरसे, गजानन गिरी, राकेश सुतार, मनोहर पाटील, राहुल महाजन, भालचंद्र राजपूत, चिंतामण पाटील, भिकन पाटील, नंदकुमार शेलगर, गजानन लोंढे, फकीरचंद पाटील, भुननेश दुसाने, स्वप्निल कुमावत आदी पत्रकार उपस्थित होते.

हेही वाचा: VIDEO | नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली; एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: journalists meetingpachora taluka journalists meetingpachora taluka latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page