• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 14, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

आळंदी (पुणे), 14 एप्रिल: झोक्यातून पडू नये म्हणून आईने घेतलेली साधी काळजीच चिमुकल्याच्या मृत्यूचे कारण ठरल्याची हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरात घडली आहे. या घटनेत अवघ्या दोन वर्षांच्या मोक्ष संदीप काळे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं? –

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी येथील बुलम रेसिडेन्सी परिसरात राहणाऱ्या काळे कुटुंबात ही घटना शनिवारी सकाळी घडली. वडील संदीप काळे हे नोकरीसाठी बाहेर गेल्यानंतर आई योगिता काळे यांनी घरकाम करण्यापूर्वी मुलगा मोक्षला आंघोळ घालून, दूध पाजून झोक्यात झोपवले. तो झोक्यातून खाली पडू नये म्हणून झोक्याच्या मध्यभागी रुमाल बांधण्यात आला होता.

दरम्यान, मोक्षची आई ही घरातील इतर कामात व्यस्त असताना, झोपेतून उठलेल्या मोक्षने झोक्यातून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी बांधलेल्या रुमालाचा गळफास लागून तो झोक्याखाली लटकताना दिसला. हा प्रकार लक्षात येताच आईने तात्काळ त्याला खाली उतरवून शेजाऱ्यांच्या मदतीने वडिलांना बोलावले.

त्यानंतर मोक्षला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्रकृती गंभीर बनत गेली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृत्यूची माहिती दिल्यानंतर कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.

जामनेर तालुक्यातील फतेपूर किन्ही येथील प्रगतशील शेतकरी सुभाष काळे यांचे चिरंजीव संदीप काळे व सून योगिता काळे हे पती-पत्नी आपल्या दोन मुलांसह सध्या पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वास्तव्यास आहेत. योगिता काळे या पाचोरा तालुक्यातील डोगरगाव येथील माजी सरपंच कै. पांढरीनाथ सावळे यांच्या कन्या होत. तर संदीप काळे हे भारतीय सैन्यात क्लर्क म्हणून कार्यरत आहेत.

दरम्यान, त्यांचा मुलगा मोक्षचा नुकताच १ जानेवारी २०२६ रोजी दुसरा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला होता. मात्र, या दुर्दैवी घटनेत कुटुंबातील अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आळंदी तसेच मूळ गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मोक्ष हा पाचोऱ्यातील पत्रकार गणेश शिंदे यांच्या भाचीचा मुलगा होता.

हेही वाचा: VIDEO | सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलिन; शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: alandi pune newsmarathi newssuvarna khandesh liveswingtwo-year-old child death

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page